Fri, Jul 19, 2019 17:53होमपेज › Kolhapur › चंद्रग्रहण पाहण्यात ढगाळ वातावरणामुळे अडथळे

चंद्रग्रहण पाहण्यात ढगाळ वातावरणामुळे अडथळे

Published On: Jul 28 2018 1:55AM | Last Updated: Jul 28 2018 1:50AMकोल्हापूर : प्रतिनिधी

एकविसाव्या शतकातील सर्वात मोठे चंद्रग्रहण शुक्रवारी रात्री पावसाची रिमझिम आणि ढगाळ वातावरण असतानाही शहरातील खगोलप्रेमींनी पाहिले. रात्री पावणेबारानंतर सुरू झालेले चंद्रग्रहण ढगाळ वातावरणाने सहजासहजी दिसत नव्हते. मात्र, विवेकानंद कॉलेजने एका सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तयार केलेल्या दुर्बिणीतून या चंद्रग्रहणाचा आनंद लुटला. 
शहर परिसरातील हौशी मंडळींनी टेरेसवर दुर्बिणीच्या माध्यमातून चंद्रग्रहण पाहण्याचा प्रयत्न केला.

 मात्र, ढगाळ वातावरणामुळे ग्रहण दिसले नसल्याने त्यांची निराशा झाली. शिवाजी विद्यापीठ परिसरातही विद्यार्थ्यांनी चंद्रग्रहण पाहण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनाही ढगाळ वातावरणाचा फटका बसला.