Wed, Jul 17, 2019 00:22होमपेज › Kolhapur › ‘स्वच्छ सर्व्हे’ अभियान १ ऑगस्टपासून

‘स्वच्छ सर्व्हे’ अभियान १ ऑगस्टपासून

Published On: Jul 24 2018 1:08AM | Last Updated: Jul 24 2018 12:45AMम्हाकवे : वार्ताहर

‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत केंद्रीय पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रालयातर्फे ग्रामीण भागात ‘स्वच्छ सर्वेक्षण’ अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये हे अभियान राबविले जाणार आहे. या अभियानामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या दहा गावांचा 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंती दिवशी गौरव करण्यात येणार आहे. 

1 ऑगस्ट ते 31 ऑगस्टदरम्यान ग्रामीण भागात स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबविण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील शासकीय शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय, आठवडी बाजार, धार्मिकस्थळांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या स्वच्छतेविषयक प्रत्यक्ष व ऑनलाईन प्रतिक्रिया नोंदवण्यात येणार आहेत.

सात ते आठ गावांमध्ये सर्वसामान्य नागरिक, विविध समूहांच्या बैठका घेण्यात येऊन स्वच्छतेविषयी सर्वेक्षण केले जाईल. अभियानात चांगली कामगिरी करणार्‍या जिल्ह्यांची क्रमवारी ठरविण्यासाठी मंत्रालयाने एकात्मिक व्यवस्थापन माहितीप्रणाली अर्थात आय.एम.आय.एस. विकसित केली आहे. या माध्यमातून 35 टक्के प्रत्यक्ष स्थानिक नागरिकांची प्रतिक्रिया, 35 टक्के उपयोगी येणार्‍या सेवांची प्रगती, 35 टक्के प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष पाहणीत सरकारी शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, आठवडी बाजार, धार्मिकस्थळांच्या ठिकाणी असलेल्या स्वच्छतागृहांची सुविधा, वापरात असलेले स्वच्छतागृह, कचरा व्यवस्थापन, पाण्याची स्वच्छता याचा विचार केला जाणार आहे.