Wed, Jul 24, 2019 14:30होमपेज › Kolhapur › सरंजामशाहीला हातात हात घालून ठेचू  : संजय मंडलिक 

सरंजामशाहीला हातात हात घालून ठेचू  : संजय मंडलिक 

Published On: Jul 24 2018 1:32AM | Last Updated: Jul 24 2018 1:13AMकसबा सांगाव  ः वार्ताहर 

स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक संपूर्ण आयुष्यभर लोकशाही सुद‍ृढ व्हावी या तत्त्वासाठी लढले. परंतु, कागल तालुक्यात पुन्हा एकदा सरंजामशाही डोके वर काढत आहे.तिला हातात हात घालून ठेचून काढूया, असे प्रतिपादन शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक यांनी केले. कसबा सांगाव (ता.कागल) येथील पंचायत समिती नूतन सभापती व उपसभापती यांच्या नागरी सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार हसन मुश्रीफ होते. 

समरजित घाटगे यांचे नाव न घेता प्रा. मंडलिक म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणूक अजून कितीतरी दूर आहे. तरी सुद्धा काही लोक गुडघ्याला बाशिंग बांधून अर्ध्या हळकुंडाने पिवळे होत आहेत. त्यांना आताच आमदार झाल्यासारखे वाटत आहे. 

आ. मुश्रीफ म्हणाले, कसबा सांगाव पाणी योजनेचा प्रस्ताव अजून कोल्हापुरातच आहे. परंतु, तो मंजूर झाल्याचे साखर-पेढे काही लोक वाटत आहेत. प्रा. मंडलिकांच्या साथीने सरंजामशाहीला नमवल्याशिवाय राहणार नाही.   यावेळी चिदानंद पाटील, राजेंद्र माने, सभापती राजश्री माने, उपसभापती विजय भोसले यांची भाषणे झाली. स्वागत संजय हेगडे यांनी केले. उमेश माळी यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन किरण घाटगे यांनी केले. संतोष आवळे यांनी आभार मानले. कार्यक्रमास शामराव जगताप, सुभाष चौगुले, बाबुराव हसुरे, मारुती पाटील, महावीर किणे, रमेश तोडकर, अमर शिंदे, प्रकाश भिडे आदी नागरीक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दूध संघ फायद्यात आणा : आ. मुश्रीफ

आ. मुश्रीफ म्हणाले, की समरजित घाटगे यांनी आम्ही मंजूर केलेल्या कामांचे स्वतः फलक लावून तिथे नारळ फोडण्यापेक्षा शाहू दूध संघ10 कोटी तोट्यात गेला आहे तो फायद्यात आणावा. सेनापती कापशी येथील काढलेले विलिंग्डन सेंटर त्यांना चालवता आले नाही, त्यावरही त्यांनी बोलावे.