Thu, Nov 15, 2018 20:33होमपेज › Kolhapur › संस्कारक्षम वयातच नागरिकशास्त्राचे धडे गरजेचे 

संस्कारक्षम वयातच नागरिकशास्त्राचे धडे गरजेचे 

Published On: Sep 09 2018 2:12AM | Last Updated: Sep 08 2018 11:54PMकोल्हापूर : प्रतिनिधी

जीवनाचे महत्त्च नागरिकशास्त्रातच आहे आणि यातून सुजाण नागरिक घडतो. प्रशासकीय पदासाठी असणार्‍या स्पर्धा परीक्षांकरिता शासन आणि व्यक्‍तिगत पातळीवर नागरिकशास्त्राला महत्त्व दिले जात असले तरी सध्याच्या शालेय अभ्यासक्रमात इतर विषयांच्या तुलनेत या विषयाला कमी महत्त्व देण्यात आले आहे. लहानपणीच संस्कारक्षम वयात नागरिकशास्त्राचे धडे दिले गेले पाहिजेत, असे प्रतिपादन अ‍ॅड. मेघा ठोंबरे यांनी केले.

दै. ‘पुढारी’ संचलित प्रयोग फोैंडेशनच्या वतीने शनिवारी झालेल्या मार्गदर्शन सत्रात प्रमुख वक्त्या म्हणून त्या महाराष्ट्र हायस्कूल येथे बोलत होत्या. ‘नागरिकशास्त्राशी मैत्री’ या विषयावर त्यांनी महाराष्ट्र हायस्कुल आणि ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींशी संवाद साधला. यावेळी प्रयोग फोैंडेशनअंतर्गत राबवलेल्या ताराराणी आत्मसंरक्षण प्रशिक्षण उपक्रम यशस्वीपणे पार पाडल्याबाबतच्या प्रशस्तिपत्राचे वितरण करण्यात आले. 

अ‍ॅड. ठोंबरे म्हणाल्या, देशाची राज्यघटना,  नागरिकशास्त्रासारख्या विषयाचे देशाच्या जडणघडीत आणि व्यक्‍तिगत उन्‍नतीत महत्त्वपूर्ण स्थान असून हा विषय सर्व पक्षांचे पदाधिकारी, संसद सदस्य, सामान्य नागरिक आणि विद्यार्थी, ग्रामीण-शहरी नागरिकांना प्रसिद्धी माध्यमांद्वारे समजावून सांगितला गेला पाहिजे. 

देशाचा नागरिक म्हणून माझे काय अधिकार आणि कर्तव्य आहेत, ते कुठून आणि कसे मिळाले याचा अभ्यास म्हणजे नागरिकशास्त्र. मानवी आयुष्यात पायाभरणीचा काळ जितका भक्‍कम तितकी इमारत मजबूत असते. 

समाजही अशा मानवी इमारतींनी घडला आणि घडवला गेला आहे. सोशल मीडियाच्या आहारी न जाता इंदिरा गांधी, सुधा मूर्ती अशा महिलांचा आदर्श जीवनात घ्यावा, असे मत त्यांनी यावेळी व्यक्‍त केले.