Wed, Jun 26, 2019 11:36होमपेज › Kolhapur › 18 अभ्यास मंडळ अध्यक्षपदांच्या निवडी बिनविरोध

18 अभ्यास मंडळ अध्यक्षपदांच्या निवडी बिनविरोध

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी 

शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यास मंडळांच्या अध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया होऊन 18 मंडळांच्या अध्यक्षांच्या जागा बिनविरोध झाल्या. तर समाजशास्त्र, मानसशास्त्र, प्राणिशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, सिव्हिल इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या विभागातील अध्यक्षपदाच्या जागा रिक्त आहेत.

विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया नुकतीच पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी निवडणुकीचा निकाल व बिनविरोध अभ्यास मंडळाच्या अध्यक्षांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. 

बिनविरोध अध्यक्ष पुढीलप्रमाणे
मानवविज्ञान अभ्यास विद्याशाखा : डॉ. राजेंद्र भोसले (हिंदी), डॉ. संभाजी भांबर (इंग्लिश अँड लिंग्विस्टिक), प्रा. डॉ. भारती पाटील (राज्यशास्त्र), डॉ. अवनिश पाटील (इतिहास). विज्ञान व तंत्रज्ञान विद्या शाखा : प्रा. डॉ. एस. एच. ठकार (गणित), प्रा. डॉ. डी. एन. काशीद (संख्याशास्त्र), प्रा. डॉ. पी. एस. पाटील (पदार्थ विज्ञान), प्रा. डॉ. जी. एस. गोकावी (केमिस्ट्री अँड केमिकल इंजिनिअरिंग), डॉ. अख्तर शेख (इलेक्ट्रॉनिक्स सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी), प्रा. डॉ. डी. के. गायकवाड (वनस्पतीशास्त्र), डॉ. संभाजी शिंदे (भूगोल व भूगर्भशास्त्र), डॉ. अशोक पिसे (मेकॅनिकल इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी), डॉ. हरिनाथ मोरे (फार्मसी). आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्या शाखा : डॉ. एस. व्ही. काळेबाग (शिक्षणशास्त्र). वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा : प्रा. डॉ. ए. एम. गुरव (कॉमर्स), डॉ. सारंग भोला (मॅनेजमेंट), प्रा. एस. एस. महाजन (अकौंटन्सी), डॉ. डी. के. मोरे (बिझनेस इकॉनॉमिक्स)

समान मते पडल्याने चिठ्ठीद्वारे विजय घोषित
मराठी अभ्यास मंडळ अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डॉ. दत्तात्रय पाटील आणि डॉ.उदय जाधव या दोन्ही उमदेवारांना समान मत पडल्याने चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. यात डॉ. दत्तात्रय पाटील विजयी झाले. अर्थशास्त्र अभ्यास मंडळाच्या निवडणुकीत डॉ. अनिलकुमार वावरे आणि डॉ. निवास जाधव यांच्या लढत झाली. 10 विरुद्ध 0 या मताच्या फरकाने डॉ. वावरे विजयी झाले.  
 

Tags : shivaji university kolhapur, Study Circles


  •