Wed, Jul 17, 2019 18:04होमपेज › Kolhapur › छिंदमचा सर्वपक्षीय निषेध

छिंदमचा सर्वपक्षीय निषेध

Published On: Feb 18 2018 1:58AM | Last Updated: Feb 18 2018 1:02AMकोल्हापूर : प्रतिनिधी

भाजपचे नगरचे उपमहापौर छिंदम यानी छत्रपती शिवराय यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ कोल्हापुरात विविध पक्ष संघटनांच्या वतीने निषेध करण्यात आला. शिवसेना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने पुतळा दहन करण्यात आला.

शिवसेनेच्या वतीने शिवाजी चौक येथे छिंदम याच्या पुतळ्याला महिला कार्यकर्त्यांनी चप्पल मारले. तसेच छिंदम यांच्यावर राष्ट्रदोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, छत्रपती शिवरायांचा अवमान शिवसेना खपवून घेणार नाही. भाजप नेत्यांची मग्रुरी वाढत चालली आहे. भाजपला सत्तेचा माज चढला आहे. तो या निवडणुकीत जनता उतरवेल. यापुढे अशा पद्धतीने वक्तव्य केल्यास महाराष्ट्रातच काय  देशातून भाजपचे नामोनिशान संपेल, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी सौ. मंगल साळोखे, पूजा भोर, गीता भंडारी, शाहीन काझी, दीपक गौड, जयवंत आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 

हिंदू एकता संघटनेच्या वतीने छिंदम यांची तिरडी यात्रा काढण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी शंखध्वनी करून निषेध केला. शहराच्या विविध मार्गांवरून तिरडी यात्रा काढून छिंदम याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. हिंदुत्ववादी संघटनांकडून उपमहापौर छिंदमची शहरातील प्रमुख मार्गावरून  प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून त्याचे दहन करण्यात आले. यावेळी बंडा साळुंखे, महेश उरसाल, चंद्रकांत बराले, सुनील पाटील,  मनोहर सोरप आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

 शिवसेना जिल्हा शाखेच्या वतीने छिंदम याच्या पुतळ्याला चप्पल मारून निषेध करण्यात आला. शिवाजी चौक येथे प्रतिमेला चप्पलाचा हार घालून तिरडी यात्रा काढण्यात आली. यावेळी जिल्हा प्रमुख संजय पवार, दुर्गेश लिंग्रस, रवी चौगुले, सुजित चव्हाण, व कार्यकर्ते उपस्थित होते.  

राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीनेही शिवाजी चौक येथे श्रीपाद छिंदम याची प्रतिमा जाळण्यात आली. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी छिंदम याच्या निषेधाच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी महापौर सौ. स्वाती यवलुजे, माजी महापौर प्रल्हाद चव्हाण, सचिन चव्हाण, सुरेश कुर्‍हाडे, एस. के. माळी, तौफिक मुल्लाणी व कार्यकर्ते उपस्थित होते.