Thu, Jul 18, 2019 02:04होमपेज › Kolhapur › दीपराज गवळी बंपर ड्रॉचा मानकरी

दीपराज गवळी बंपर ड्रॉचा मानकरी

Published On: Dec 03 2017 1:32AM | Last Updated: Dec 03 2017 12:39AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

दैनिक ‘पुढारी’तर्फे बालदिन गौरव विशेष लकी ड्रॉ योजनेंतर्गत घेण्यात आलेल्या ‘शुभेच्छा द्या, बक्षिसे जिंका’ या स्पर्धेत दीपराज देवेंद्र गवळी हा बंपर ड्रॉचा मानकरी ठरला. स्टाईलतर्फे दीपराजला बंपर प्राईजअंतर्गत चिल्ड्रन कार बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

राजारामपुरी नवव्या गल्लीतील स्पाईस किडस् अँड लेडीज शॉपीमध्ये शनिवारी लकी ड्रॉ उत्साहात पार पडला. स्टाईलचे यश चंदवाणी यांच्या हस्ते बंपर ड्रॉसाठी तर, फ्रॉस्टी आईस्क्रीमच्या सविता शर्मा, घोडावत कंझ्युमर्सचे अबुसुफियान चौधरी, स्पाईसचे सूरज जेवराणी यांच्या हस्ते अनुक्रमे पाचशे, एक हजार आणि पंधराशे रुपयांच्या रोख बक्षिसासाठी लकी ड्रॉ काढण्यात आला. सुरुवातीला दैनिक ‘पुढारी’चे विभागीय जाहिरात व्यवस्थापक शशिकांत पोवार यांनी उपस्थित सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी शहर जाहिरात व्यवस्थापक शरद कोतेकर, ग्रामीण जाहिरात व्यवस्थापक जावेद शेख व सर्व जाहिरात प्रतिनिधी उपस्थित होते.

स्पर्धेतील विजेत्यांची नावे :

बंपर ड्रॉ : दीपराज देवेंद्र गवळी (चिल्ड्रन कार).लकी ड्रॉ (रोख बक्षिसे) : विराज समीर सदलगे (प्रथम), अथर्व अमोल गुजर (द्वितीय), नितीन सुनील छाबडिया (तृतीय). याशिवाय स्पर्धेतील सहभागी सर्व बालकांना स्पाईसतर्फ सरप्राईज गिफ्ट, फ्रॉस्टी आईस्क्रीमकडून फॅमिली पॅक आणि फ्रुस्टारतर्फे फ्रुट ड्रिंक्स देण्यात येणार आहे. ही बक्षिसे सुट्टीखेरीज भाऊसिंगजी रोड येथील दै. ‘पुढारी’ भवन कार्यालयातून सकाळी 11 ते सायंकाळी 5 यावेळेत घेऊ जावे.