होमपेज › Kolhapur › मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूर दौर्‍यावर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूर दौर्‍यावर

Published On: Jun 13 2019 1:33AM | Last Updated: Jun 13 2019 1:11AM
कोल्हापूर : प्रतिनिधी

कागल येथील शाहू सहकारी साखर कारखाना परिसरात दिवंगत श्रीमंत विक्रमसिंह घाटगे यांचा पुतळा अनावरण समारंभासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी (दि. 13) कोल्हापूर दौर्‍यावर येत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस दोन वाजण्याच्या सुमारास कागल येथे पोहोचतील, असा अंदाज आहे. शाहू कारखानास्थळी आयोजित शेतकरी मेळाव्यास उपस्थित राहून ते कराडकडे रवाना होणार आहेत. पुणे म्हाडा अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या विनंतीवरून मुख्यमंत्री फडणवीस तिसर्‍यांदा कागल तालुक्यात येत आहेत. श्रीराम मंदिर उद्घाटन, राजे बँकेचे नामकरण, यानंतर आता श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष श्रीमंत विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळ्याचे अनावरण कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री फडणवीस कागल येथे येत आहेत. पुतळा अनावरण आणि शेतकरी मेळावा, असा यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांचा नियोजित कार्यक्रम आहे. कागल येथील कार्यक्रम संपल्यानंतर कराड येथील कृष्णा साखर कारखाना परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरण समारंभासाठी उपस्थित राहणार आहेत.

...असा आहे दौरा
दुपारी दोन वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन
 2.25 : कागलकडे रवाना
 2.30 : स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळा अनावरण समारंभास उपस्थिती 
 2.40 : श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूल पटांगणावर शेतकरी मेळाव्यास उपस्थिती
 4.00 : कोल्हापूर विमानतळ येथून हेलिकॉप्टरने कराडकडे 
 6.00 : कोल्हापूर विमानतळावरून विमानाने मुंबईकडे प्रयाण