शिवराज्याभिषेकासाठीचे पवित्र जल संभाजीराजे यांच्याकडे सुपूर्द

Last Updated: Jun 03 2020 7:37PM
Responsive image


कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन

दरवर्षी रायगडावर साजरा होणारा शिवराज्याभिषेक हा संपूर्ण महाराष्ट्रात लोकोत्सव बनला आहे. कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली गेली कित्येक वर्षे छत्रपती शिवाजी राजांचा राज्याभिषेक स्वराज्याच्या राजधानीवर म्हणजे रायगडावर संपन्न होतो. या उपक्रमासाठी देशभरातून अनेक शिवप्रेमी उपस्थित असतात. मात्र यंदा कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा अत्यंत मर्यादित मावळ्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

इतिहासात असा उल्लेख आहे कि शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी भारतातील पवित्र ठिकाणाहून जल आणलं होतं. दरम्यान या सोहळ्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूर हायकर्स या ट्रेकिंग ग्रुपतर्फे हिमालयातील पवित्र ठिकाणाहून आणि महारष्ट्रातील गड किल्ल्यांवरून राज्याभिषेकासाठी पवित्र जल आणण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. यावर्षी अलंग, मदन, कुलंग येथील पवित्र जल या सोहळ्यासाठी आणले आहे.

रायगडावर मूख्य कार्यक्रमादिवशी म्हणजेच ६ जून ला, ३४७ व्या शिवराज्याभिषेकामध्ये शिवमूर्तीवर छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते कोल्हापूर हायकर्सच्या ग्रुपने आणलेल्या पवित्र जलाने अभिषेक करण्यात येणार आहे. मात्र यंदाच्या कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर सदर पवित्र जल हे छत्रपती संभाजीराजे यांच्याकडेच सुपूर्द केले आहे, अशी माहिती कोल्हापूर हायकर्सचे संस्थापक श्री सागर पाटील यांनी दिली.

सोनिया गांधींकडून मोठा निर्णय! गुजरात काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी हार्दिक पटेल यांची वर्णी!


राज्यात कोरोनाबाधितांचा आजवरचा विक्रम मोडीत


सांगली झेडपीचे जितेंद्र डुडी नवे 'सीईओ'


मुंबई मनपाचे सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार यांचे कोरोनाने निधन


कोरोना : राज्यात १ लाख ६४ हजार गुन्हे दाखल


कोल्हापूर : परितेत कोरोनाबाधित सापडल्याने भोगावती परिसर हादरला


पुण्यात निर्णयांचा धडाका सुरुच; मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांची तडकाफडकी बदली!


शाळेतून पुस्तके गणवेश खरेदी करण्याची सक्ती केल्यास गुन्हे दाखल करा : मंत्री बच्चू कडू


औरंगाबाद : रस्त्यालगतच्या ५१ निराश्रीतांना आसरा


ठाणे जिल्हा १९ जुलैपर्यंत लॉकडाऊन