Tue, Apr 23, 2019 09:37होमपेज › Kolhapur › बंटी-बबलीचा रिचार्ज अ‍ॅपवरून अनेकांना गंडा (व्हिडिओ)

बंटी-बबलीचा रिचार्ज अ‍ॅपवरून अनेकांना गंडा (व्हिडिओ)

Published On: Dec 08 2017 7:07PM | Last Updated: Dec 08 2017 7:07PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी 

शहरात गेल्या काही दिवसांपासून या रिचार्ज अ‍ॅपवरून अनेकांची मोठी फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. एक चाळीशीच्या आसपासची व्यक्ती आणि मुलगी हे दोघे मिळून हा प्रकार करत असल्याचे उघड झाले असून, ही 'बंटी-बबली'ची जोडी पोलिसांसाठीही आव्हान ठरत आहे.  याबाबत सागर विलास साळोखे (वय 34, रा. रंकाळा स्टॅन्ड नजीक) यांनी राजवाडा पोलिसांत फिर्याद दिली. 

मोबाईलवर रिजार्च करण्यासाठी नवीन अ‍ॅप लॉच करून ग्राहकांची फसवणूक केली जात होती. तर शहरात वितरक नेमणार असल्याचे सांगत राजेश मेनन व अंजली सावळे या दोघांनी अनेकांना गळ घातला. मागील सात दिवसांत राजेश मेनन व अंजली सावळे या जोडीने अनेकांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. 

जादा कमिशनचा मोह

संशयित राजेश मेनन व अंजली सावळे हे सागर साळोखे  यांच्या दुकानात आले. अ‍ॅप किंग नावाचे नवे अ‍ॅप बाजारात आले असून, यातून रिचार्ज केल्यास दुकानदाराला ४ टक्के तर वितरकाला ७ टक्के कमिशन मिळणार असल्याचे सांगितले. तर शहरातील १०० हून अधिक दुकानात हे अ‍ॅप सुरू असून, तुम्ही ही वापरा असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर मेनन याने साळोखेंना १ हजार रुपयांच्या बदल्यात तत्काळ १ हजार ४० रुपयांचा बॅलन्स उपलब्ध करून दिला. 

दोघांना गंडा

संशयित मेनन व अंजली सावळे दोघे गुरुवारी सकाळी साडेबाराच्या सुमारास साळोखे यांच्या दुकानात आले. याआधी पाडळकर मार्केट येथील सचिन बिरंजे यांच्याकडूनही दोघांनी ५० हजार रुपये घेतले होते. तर साळोखेंकडून ६० हजार रुपये घेतले. दुपारी कंपनीचे अधिकारी मार्केटला येणार असल्याचे सांगितले. दोघेही मार्केटला फिरून येतो असे सांगून निघून गेले. 

दुकानदारांची फसगत

गुरुवारी दुपारी एक नंतर परिसरातील काही दुकानदारांनी घेतलेल्या किंग अ‍ॅपवरील बॅलन्स रिफंड झाला. याची माहिती मिळताच सागर साळोखे, सचिन बिरंजे यांच्यासह दहा ते पंधरा दुकानदार एकत्र आले. सर्वांनी मेनन व अंजली सावळे यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण दोघांचे मोबाईल बंद होते.