Thu, Feb 21, 2019 16:12होमपेज › Kolhapur › कस्तुरी क्लबसह सिनेकलाकारांशी दिलखुलास गप्पा

कस्तुरी क्लबसह सिनेकलाकारांशी दिलखुलास गप्पा

Published On: Apr 24 2018 1:27AM | Last Updated: Apr 23 2018 11:59PMकोल्हापूर : दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबतर्फे सभासदांसाठी कार्यशाळा, शैक्षणिक उपक्रम राबवून महिलांचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी प्रयत्न केले जातात. तसेच अनेक मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते व सभासदांची करमणूक केली जाते. अनेक सिने, नाट्य कलाकारांना भेटण्याची, त्यांना प्रत्यक्ष बघण्याची संधी कस्तुरी क्लबमार्फत नेहमीच महिलांना मिळत असते. 

याही वेळेस मराठी चित्रपट रणांगण यातील प्रमुख कलाकार सचिन पिळगावकर, स्वप्निल जोशी, प्रणाली घोगरे यांना भेटण्याची संधी महिलांना मिळणार आहे. तसेच यांच्याबरोबरच्या दिलखुलास गप्पा प्रत्यक्ष अनुभवता येणार आहेत. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक श्री ट्रॅव्हल्स हे आहेत. या चित्रपटातून रणांगणात सुरू असलेले एक वेगळेच युद्ध प्रेक्षकांसमोर येणार आहे; ज्यात  स्वप्निल जोशी आणि सचिन पिळगावकर एकमेकांविरोधात उभे आहेत. या कलाकारांबरोबरच सिद्धार्थ चांदेकर, प्रणाली घोगरे, सुचित्रा बांदेकर आणि आनंद इंगळे अशा दिग्गज कलाकारांच्याही भूमिका आहेत.  चित्रपटाची निर्मिती करिश्मा जैन आणि जो राजन यांनी केली आहे, तर दिग्दर्शक राकेश सारंग हे आहेत. असा हा हटके मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 

हा कार्यक्रम रविवार, दि. 29 एप्रिल 2018 रोजी दुपारी 4 वाजता व्ही. टी. पाटील हॉल, कमला कॉलेज येथे होणार असून या कार्यक्रमाचे पासेस टोमॅटो एफ. एम. कार्यालय येथे आज दु. 12.00 नंतर उपलब्ध होतील. 

अधिक माहितीसाठी संपर्क :
टोमॅटो एफ. एम. वसंत प्लाझा, 5 वा मजला, बागल चौक, कोल्हापूर. फोन : 8805007724, 880502424.

Tags : Kolhapur, Chat, room, cinematographers,  Kasturi clubs