Thu, Jan 24, 2019 04:44होमपेज › Kolhapur › निवृत्त डीवायएसपींवर पाठलाग करून हल्ला

निवृत्त डीवायएसपींवर पाठलाग करून हल्ला

Published On: Aug 27 2018 1:14AM | Last Updated: Aug 27 2018 12:20AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

दाभोळकर कॉर्नर येथे शनिवारी रात्री झालेल्या हल्ल्यात निवृत्त पोलिस उपअधीक्षक बाळासाहेब कोंडिबा सांगले (वय 60, रा. ताराबाई पार्क) जखमी झाले. रात्री एकच्या सुमारास  ही घटना घडली. लोखंडी गज डोक्यात लागल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याची नोंद शाहूपुरी पोलिसांत झाली.

बाळासाहेब सांगले हे सांगली जिल्ह्यातून उपअधीक्षक पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. सध्या ते कोल्हापुरातील ताराबाई पार्कात राहण्यास आहेत. शनिवारी रात्री दाभोळकर कॉर्नरनजीक त्यांचा एका तरुणाशी वाद झाला. यातून चिडून संबंधिताने काही वेळानंतर सांगले यांचा पाठलाग करून लोखंडी गजाने मारहाण केली. 

डोक्यात घाव लागल्याने सांगले गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. शाहूपुरी पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.