Wed, Jul 15, 2020 17:19होमपेज › Kolhapur › तुम्हाला शाहू महाराजांची शपथ आहे : चंद्रकांत पाटील (video)

तुम्हाला शाहू महाराजांची शपथ आहे : चंद्रकांत पाटील (video)

Published On: Jan 03 2018 5:24PM | Last Updated: Jan 03 2018 5:25PM

बुकमार्क करा
कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन

सर्व जाती धर्मातील लोकांना आवाहन आहे की जिथे असाल तिथून परत जा तुम्हाला शाहू महाराजांची शपथ आहे. असे आवाहन राज्याचे महसुलमंत्री चंदकांत पाटील यांनी केले.  राज्यात भीमा कोरेगाव प्रकरणानंतर काही संघटनांकडून महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता. हा बंद शांततेत पार पडायला हवा, दोन जातींमध्ये तेढ निर्माण होणे हे शाहू महाराजांची परंपरा असलेल्या कोल्हापूरात हे घडणे निंदनीय आणि दु:खद असल्याचे सांगत लोकांना शांतता राखण्याचे आवाहन त्यांनी केले.

भीमा कोरेगाव प्रकरणानंतर राज्यात महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. यानंतर अनेक ठिकाणी दगडफेक, जाळपोळ, रास्तारोको करण्यात आल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते. दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन बंद मागे घेतल्याचे सांगितले.