Sun, Jul 21, 2019 01:41होमपेज › Kolhapur › ‘आम्हाला २०१९ द्या, तुम्हाला २०२४ देऊ’

‘आम्हाला २०१९ द्या, तुम्हाला २०२४ देऊ’

Published On: Apr 14 2018 7:46AM | Last Updated: Apr 14 2018 8:54AMकागल : प्रतिनिधी

कागल तालुक्यातील राजकीय नेत्यांनी 2019 आम्हाला देऊन टाका. 2024 तुम्हाला देऊ, वेळ आणि पैसा वाया घालवू नये, पैसे जपून ठेवा, लोकांच्या कल्याणासाठी उपयोगी पडतील, असा सल्‍ला कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला.

कागल येथे मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष यांच्या वतीने छ. शाहू साखर कारखाना राजे विक्रमसिंह घाटगे को-ऑप बँक व राजे विक्रमसिंह घाटगे फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित मोफत महाआरोग्य शिबिरात पालकमंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते. त्यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे व इतर मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री चंद्रकात पाटील यांनी आजरा नगरपंचायतीची निवडणुकीच्या निकालानंतर प्रथमच तिखट प्रतिक्रिया दिली. प्रत्येक निवडणुकीत देव पाण्यात ठेवले जातात. ही तर निवडणूक जिंकू दे! मात्र देव समरजितसिंह घाटगे यांच्या सारख्यांनाच जे पुण्याईची कामे करतात त्यांनाच प्रसन्‍न होतो. आजरा निवडणुकीतून अशी सूचना आहे की, काश्मीरच्या फारुख अब्दुल्‍लाच्या मुलाने देशभरातील राजकीय पक्षाच्या नेत्यांना सांगितले की, तुम्ही 2019 ची निवडणुक लढू नका, डायरेक्ट 2024 ची निवडणूक लढा. तरी ते ऐकत नाहीत. मात्र, आपल्या विभागातील नेत्यांना मी अशी सूचना करेन की, परत तुम्ही 2019 लढू नका, कागलला तर नक्‍की ही सूचना देईन. हवे तर मी माझी जबाबदारी घेईन, समरजितसिंह घाटगे यांच्याकडून शब्द घेण्याची की, 2024 तुम्हाला देऊ. 2019 आम्हाला देऊन टाका. मग तुमचे पैसे ही वाचतील आणि आयती आमदारकी मिळेल. 

तसेच समरजितसिंह घाटगे एका टर्ममध्ये समाधानी होतील. नंतर त्यांना आम्ही राज्यसभेवर घेऊ. दिल्‍लीमध्ये खासदार छ. संभाजीराजे यांच्याबरोबर काम करतील. असे त्यांनी यावेळी स्पष्ट करून समरजितसिंह घाटगे यांनी कामाचा प्रचंड धडाका लावला आहे. अनेकांच्या मनामध्ये धडकी भरली आहे. त्यांना सारखे धडधड होत आहे, असे ते म्हणाले.

Tags : Election, 2019, BJP, Minister, Chandrakant Patil, kagal,