Wed, Apr 24, 2019 12:33होमपेज › Kolhapur › ‘महाराष्ट्र केसरी’साठी चंद्रहार पाटील, सूर्यवंशी

‘महाराष्ट्र केसरी’साठी चंद्रहार पाटील, सूर्यवंशी

Published On: Dec 11 2017 1:29AM | Last Updated: Dec 11 2017 12:51AM

बुकमार्क करा

वाळवा : प्रतिनिधी

वाळवा येथे आयोजित केलेल्या महाराष्ट्र केसरी निवड चाचणी स्पर्धेमध्ये गादी विभागामध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील तर माती विभागामध्ये सतीश सूर्यवंशी (भाटवडे) हे विजेते ठरले. हे सांगली जिल्ह्याचे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत प्रतिनिधीत्व करतील. 

57 किलोमध्ये अजय केसरे (रेड), विजय महाडिक (कडेपूर), 61 किलोमध्ये प्रकाश कोळेकर (आरेवाडी), विशाल मोहिते (कवलापूर), 65 किलो- सागर थोरात (सावळज), शुभम नागे  (सांगली). 70 किलो- अजित शेजुळ (मालगाव), अंकुश माने (वाळवा), 74 किलो- नीलेश पाटील (पणुंबे्र), प्रितम पाटील (हातनूर), 79 किलो- मनोज कोडग (आगळगाव), अमर पाटील (बिळाशी). 86 किलो- अनिकेत मोरे (पलूस), विवेक नायकल (पेठ), 92 किलो- हर्षवर्धन थोरात (सावळज), अमर गावडे (कडेगाव).

माती विभागामध्ये 57 किलो- वैभव पाटील (बोरगाव), प्रमोद पाटील (कणदूर), 61 किलो- प्रवीण पाटील (आमणापूर), राहुल पाटील (सुरूल), 65 किलो- सागर पवार (पेठ), संदीप जाधव (तांबवे), 70 किलो- पृथ्वीराज रसाळ (बुधगाव), अनिकेत पाटील (वाळवा), 74 किलो- मंथन बंडगर (देशिंग), सुजित नवले (वाळवा), 79 किलो- लक्ष्मण थोरात (सावळज), नामदेव केसरे (रेड).

86 किलो- विजय शिसाळ (पलूस), विश्‍वजित कदम (नेर्ले), 92 किलो- अमित इंगळे (पणुंब्रे), वैभव रास्कर (कडेगाव), 97 किलो अजय निकम (रेड), शंकर मोहिते (कडेगाव) यांना अनुक्रमे सुवर्ण व रजतपदक मिळाले. उद्योगपती ज्ञानदेव साळुंखे व आप्पा कदम, गौरव नायकवडी, नामदेवराव मोहिते,  नंदू पाटील, शंकर थोरात, रामचंद्र पाटील आदी उपस्थित होते.