Sat, Feb 16, 2019 02:35होमपेज › Kolhapur › वारणाकाठावरील 283 गावांत आजपासून साखळी उपोषण

वारणाकाठावरील 283 गावांत आजपासून साखळी उपोषण

Published On: May 17 2018 1:27AM | Last Updated: May 16 2018 11:37PMदानोळी : वार्ताहर

आ. सुरेश हाळवणकर हे इचलकरंजीच्या जनतेची दिशाभूल करत आहेत. ग्रामीण विरुद्ध शहरी असा भेदभाव करत आहेत. त्यांनी काहीही केले तरी वारणेचे पाणी देणार नाही, असा इशारा वारणा बचाव कृती समितीचे अध्यक्ष महादेवराव धनवडे यांनी दिला. दरम्यान, वारणाकाठावरील 283 गावांत गुरुवारपासून साखळी उपोषण करण्यात येणार आहे.इचलकरंजी बंददरम्यान त्यांनी केलेले वक्‍तव्य हे लोकप्रतिनिधींना शोभणारे नाही. त्यांचा आम्ही संपूर्ण वारणाकाठ निषेध करतो. तसेच अमृत योजनेविरोधात गुरुवारपासून वारणाकाठावरील 283 गावे, 283 दिवस साखळी उपोषण करतील, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.