Wed, Jul 17, 2019 08:00होमपेज › Kolhapur › मध्यवर्ती बसस्थानक चोरट्यांचे आश्रयस्थान

मध्यवर्ती बसस्थानक चोरट्यांचे आश्रयस्थान

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक चोरट्यांचे आश्रयस्थान बनले आहे. रात्री-अपरात्री एस.टी.च्या सुरक्षारक्षकांच्या समोरच बिनदिक्‍कत चोरटे आवारात थांबून असतात. दोन आठवड्यांपूर्वी मोबाईल चोरट्याने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या श्रीधर पांडुरंग पोवार (वय 63, रा. नितवडे, ता. भुदरगड) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या गंभीर प्रकाराने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

महिलांची टोळी...

बसमध्ये चढताना किंवा उतरताना गर्दीचा फायदा घेत महिलांच्या पर्स लंपास होण्याच्या घटना दररोज घडतात. यामध्ये किमती ऐवज, दागिने चोरीस जाण्याच्या घटनांचा समावेश आहे. यामागे महिलांची एक टोळी कार्यरत असल्याचा संशय आहे. या महिला लहान मुले काखेत घेऊन प्रवाशांच्या पाठीमागून जातात. यामुळे त्यांच्यावर सहसा संशय येत नाही. 

एस.टी.मधून साहित्य लंपास

बस सुटण्याच्या प्रतीक्षेत असणार्‍या प्रवाशांच्या बॅगा चोरल्या जातात. अनेकदा प्रवासी काही निमित्ताने बसस्थानकावर उतरलेले असतात. अशा प्रवाशांच्या कॅरेजमध्ये ठेवलेल्या बॅगा चोरीस जातात. या चोरट्यांवर नियंत्रण नेमके कुणाचे, हा सवाल उपस्थित होत आहे. 

पोलिस यंत्रणा तोकडी

शाहूपुरी पोलिस ठाण्यातील कर्मचारी गस्तीसाठी याठिकाणी नेमले जातात; पण अपुर्‍या मनुष्यबळामुळे सर्वत्र लक्ष ठेवता येत नाही. यासह एस.टी.चे सुरक्षा रक्षण असूनही दररोज चोरीचा एखादा प्रकार घडत आहे.  चोरट्याने घेतला बळीचोरीच्या उद्देशाने 13 मार्चला चोरट्याने केलेल्या मारहाणीत निवृत्त शासकीय कर्मचार्‍याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने प्रवाशांतून संताप व्यक्‍त होत आहे. मध्यवर्ती बसस्थानक परिसरात भरदिवसा घडलेल्या या घटनेने नाहक एका प्रवाशाचा बळी घेतला. याप्रकरणी राहुल रामू गवळी ऊर्फ गोग्या याला पोलिसांनी अटक केली आहे.

Tags : Kolhapur, Kolhapur News, Central, Bus, Station, criminals, Shelters


  •