Mon, May 20, 2019 20:05होमपेज › Kolhapur › राष्ट्रीयीकृत बँकांचा ‘कॅश हँडलिंग’ दणका

राष्ट्रीयीकृत बँकांचा ‘कॅश हँडलिंग’ दणका

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

राशिवडे : प्रतिनिधी

ग्राहक हा बँकांचा आत्मा आहे; पण या आत्म्यालाही आता रिझर्व बँकेच्या नव्या नियमावलीचा धक्‍का बसत आहे. कँश हँडलिंगच्या नावाखाली चिल्लर व दहाच्या नोटांचा भरणा करणार्‍या ग्राहकांना या नव्या नियमाचा दणका बसत असून पेपरलेस व्यवहारासाठी ग्राहकांना प्रवृत्त केले जात आहे.ग्राहकांनी पेपरलेस व्यवहार करून अर्थिक व्यवहार ऑनलाईन,डिजिटल ट्रान्झक्शनद्वारे,ए.टी.एम, पे.टी.एम, पे.फोन पद्धतीने करावा यासाठी प्रवृत्त केले जात आहे. बँकांकडे अर्थिक  व्यवहार करताना  मिनिमम बँलन्स, मेंटनस् चार्ज आदी चार्जेस आकारले जातात. परंतु, चिल्लरसह दहा रुपयांच्या नोटांचा भरणा करताना ठराविक रकमेनंतर कँश हँडलिंग म्हणून पाच टक्के चार्जेस आकारले जात आहेत. ग्राहकांनी डिजिटल ट्रान्झक्शन करावे म्हणून जनजागरण केले जात असताना एन. एफ. टी. करतानाही ठराविक चार्जेस आकारले जातात.

जिल्ह्यामध्ये सुमारे वीसहून अधिक राष्ट्रीयीकृत बँका व त्यांच्या शाखांचा विस्तार आहे. एक लाखावरील भरण्यामध्ये दहाच्या नोटा आणि जर चिल्लर असेल तर ठराविक रक्‍कम कँश हँडलिंग म्हणून ठराविक रक्‍कम खात्यावरून कपात होत, त्यामुळे ग्राहकच आता वैतागले आहेत. किरकोळ विक्रेते, शेतकरी, हमाल आदी लोकांकडे चिल्लर व 10 ते पन्‍नास रुपयांच्या नोटांचा भरणा सर्वाधिक होत असतो तर मोठमोठे व्यापारी, उद्योजक पाचशे, दोन हजारच्या नोटांचा भरणा करत असतात त्यामुळे या कँश हँडलिंगचा नाहक भुर्दंड सर्वसामान्य ग्राहकांनाच सोसावा लागत आहे.एक तर ग्रामीण भागामध्ये सोयी- सुविधांची वानवा आहे आणि जर जवळच्या निमशहरी अथवा शहरी भागात बँकेमध्ये भरणा करण्यासाठी जाताना नाहक वेळ व अर्थिक भुर्दंड सोसावा लागतोच व कँश हँडलिंगचा दणकाही सोसावा लागत आहे.प्रामुख्याने  किरकोळ स्वरूपाचे चलन फिरते आणि खेळते असणे गरजेचे असताना या चलनाचा भरणा करताना मात्र कँश हँडलिंगचा नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे.

Tags : Kolhapur, Kolhapur News, Cash, Handling, Nationalized, Banks, Custmor, Reserve Bank


  •