Wed, Apr 24, 2019 21:32होमपेज › Kolhapur › देशाची एकता, अखंडता, सुरक्षिततेचा विद्यार्थ्यांचा निर्धार (व्हिडिओ)

देशाची एकता, अखंडता, सुरक्षिततेचा विद्यार्थ्यांचा निर्धार (व्हिडिओ)

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

शिवाजी विद्यापीठात कँडल मार्च काढून 26/11 हल्ल्यातील शहिदांना अभिवादन करण्यात आले. यावेळी भारत माता की जय...वंदेमातरम्...वीर शहिद जवान अमर रहे अशा घोषणा देत भ्याड दहशतवादी हल्ल्यास आम्ही घाबरणार नाही. देशाची एकता, अखंडता, सुरक्षिततेला बाधा येऊ देणार नाही, असा निर्धार विद्यार्थ्यांनी केला. 

वृत्तपत्रविद्या व  मास कम्युनिकेशन विभागाच्यावतीने रविवारी (दि.26) सायंकाळी कँडल मार्च काढण्यात आला. मुलींच्या वसतीगृहापासून कँडल मार्चला प्रारंभ झाला. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर शहीदांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. मेणबत्त्या प्रज्वलित करुन दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिस अधिकारी, कर्मचारी, सैन्याचे जवान आणि नागरिक यांना आदरांजली वाहण्यात आली. 

याप्रसंगी विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्ती, आरोग्य, प्रामाणिकपणा, देशाप्रती निष्ठा ठेवून दहशतवादाला थारा न देण्याची शपथ घेतली. आकाश बोकमूरकर यांनी शपथ वाचन केले. कँडल मार्चमध्ये मुला-मुलींच्या वसतीगृहातील विद्यार्थ्यांसह  सहलीस आलेले सोलापूर येथील श्री दत्त प्रशालेतील विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी उपकुलसचिव डॉ. व्ही.एन.शिंदे, वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र विभागप्रमुख डॉ. निशा मुडे-पवार, सहयोगी प्रा.डॉ.शिवाजी जाधव, डॉ. सुमेधा घाटगे, डॉ. प्रवीण कोडोलीकर, सुरक्षा विभागातील शिवाजी पाटील, किरण पोवार, व्ही.एस.डावरे, डी.जी.मोहिते आदी उपस्थित होते. 
 

व्हिडिओ : प्रविण मस्के