Fri, Nov 16, 2018 06:38होमपेज › Kolhapur › कोवाड येथे २० एकरांतील ऊस जळाला

कोवाड येथे २० एकरांतील ऊस जळाला

Published On: Jan 09 2018 1:33AM | Last Updated: Jan 08 2018 11:15PM

बुकमार्क करा
कोवाड : वार्ताहर 

कोवाड (ता. चंदगड) येथे लागलेल्या आगीमध्ये वीस एकरांतील ऊस जळून खाक झाला. यामध्ये सुमारे 25 लाखांचे नुकसान झाले आहे. 

कोवाड-कालकुंद्री रस्त्याकडील तांबाळ नावाच्या शेतात दुपारी 2 वाजता डीपीमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे आग लागली. भर दुपारचे ऊन व सुटलेला वारा यामुळे आग वेगाने पसरत गेली. वार्‍यामुळे आग आटोक्यात आणण्याचे शेतकर्‍यांचे प्रयत्न निष्फळ ठरले.

या आगीमध्ये तानाजी आडाव, नामदेव आडाव, विठ्ठल आडाव, आनंद आडाव, जोतिबा अडाव, मारुती अडाव, गंगाराम पवार, अर्जुन पवार, विठ्ठल पवार, राजू वांद्रे, रामा वांद्रे, वैजू वांद्रे, सोमाना वांद्रे, उत्तम मुळीक, कृष्णा कांबळे, सचिन बागिलगेकर या शेतकर्‍यांचा ऊस जळाला. त्यामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.  गळीत उसाची उचल ओलम अ‍ॅग्रो (हेमरस) साखर कारखान्याने तातडीने करावी व महावितरण कंपनीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.