Wed, Jul 17, 2019 18:35होमपेज › Kolhapur › रंकाळा, फुलेवाडीत दोन घरफोड्या

रंकाळा, फुलेवाडीत दोन घरफोड्या

Published On: Dec 03 2017 1:29AM | Last Updated: Dec 03 2017 1:03AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

रंकाळा, फुलेवाडी परिसरातील बंद बंगले, फ्लॅट शुक्रवारी रात्री चोरट्यांनी लक्ष्य केले.पराग अशोक द्रविड यांचा रंकाळ्याच्या पिछाडीस लेक विस्टा इमारतीत फ्लॅट आहे. चार दिवसांपूर्वी काकती येथे मूळगावी ते गेले होते. शनिवारी ते घरी परतले असता चोरट्यांनी घरातील अडीच लाखांचे सात तोळे दागिने लंपास केल्याचे आढळून आले.

फुलेवाडी सहावा बसस्टॉप येथील लक्ष्मीकांत संकपाळ यांचाही बंद बंगला चोरट्यांनी फोडून चांदीचा ऐवज व आठ हजार रुपये चोरले. संकपाळ पाटबंधारे विभागात कनिष्ठ अभियंता आहेत. त्यांचा मुलगा शिक्षणानिमित्त कोल्हापुरात असतो. बुधवारी तो सांगलीला गेला होता. बंगल्याचे दार उघडे असल्याचे शेजार्‍यांनी कळवल्याने संकपाळ यांची पत्नी रूपाली व मुलगा कोल्हापुरात आले. बंगल्यात पाहिले असता चोरी झाल्याचे उघड झाले.