Wed, Feb 20, 2019 19:39होमपेज › Kolhapur › निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आश्वासनांचा अर्थसंकल्प : डॉ. ककडे (Video)

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आश्वासनांचा अर्थसंकल्प : डॉ. ककडे (Video)

Published On: Feb 01 2018 4:23PM | Last Updated: Feb 01 2018 4:23PMकोल्हापूर : प्रतिनिधी

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी निश्चलीकरण आणि जीएसटीच्या पार्श्वभूमीवर २०१८-१९ या वर्षाचा अर्थसंकल्प जाहीर केला. हा अर्थसंकल्प निवडणूका डोळ्यासमोर ठेवून सादर करण्यात आला असल्याचे मत शिवाजी विद्यापीठाचे अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. विजय ककडे यांनी व्यक्त केले. या अर्थसंकल्पात ग्रामिण भागासाठी आणि आरोग्यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. मात्र उद्योग क्षेत्रासाठी भरीव तरतूद दिसत नाही. पगारदार वर्गाला करात सूट मिळण्याची अपेक्षा होती ती नाही. हा अर्थसंकल्प आश्वासन देणारा असल्याचे डॉ. ककडे यांनी म्हटले आहे.