Mon, Mar 25, 2019 03:03
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › दोघा शाळकरी मुलांचा बुडून

दोघा शाळकरी मुलांचा बुडून

Published On: Mar 13 2018 1:41AM | Last Updated: Mar 13 2018 12:46AMमृत्यू; हातकणंगलेतील घटनाहातकणंगले : प्रतिनिधी

पोहायला गेलेल्या दोन बारा वर्षीय शाळकरी मुलांचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. अफान साहेबलाल सय्यद (रा. संगीता धाब्याच्या मागे, पेठभाग हातकणंगले) व आमीन हमीद मुजावर (रा. लोहार गल्ली, हातकणंगले) अशी त्यांची नावे आहेत. ही घटना सोमवारी दीडच्या सुमारास घडली.

अफान व आमीन हे दोघे सहावीमध्ये शिकत होते. दोघेही गावाशेजारील विहिरीत मित्रांसोबत पोहायला गेले. अफान पोहत होता. काठावर उभ्या असलेल्या आमीन याने पाण्यात 
उडी मारली; पण घाबरून त्याने अफानला मिठी मारली. दोघांच्याही तोंडात पाणी जाऊन ते बुडू लागताच काठावरील मित्रांनी आरडाओरडा केला. त्यावेळी जवळून जात असलेल्या अन्य मुलांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला.

दोघांना काही मिनिटांतच पाण्याबाहेर काढण्यात आले. दरम्यान, स्वप्निल नरुटे याने अ‍ॅम्ब्युलन्स घेऊन घटनास्थळी धाव घेतली. त्याने तातडीने त्यांना ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले. घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. दोघेही गरीब कुटुंबातील आहेत. या घटनेने हळहळ व्यक्‍त केली जात आहे.