Tue, Jul 16, 2019 22:39होमपेज › Kolhapur › अतिक्रमणे जमीनदोस्त करा

अतिक्रमणे जमीनदोस्त करा

Published On: Apr 08 2018 2:02AM | Last Updated: Apr 07 2018 11:55PMकोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर ते गांधीनगर रोडवरील तावडे हॉटेल परिसरातील जागा महापालिकेचीच असल्याचे स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे 10 एप्रिलला मुंबईत मंत्रालयात होणार्‍याबैठकीतील निर्णयाची वाट न इमारती जमीनदोस्त कराव्यात, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तावडे हॉटेल परिसरात झालेल्या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. 

यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आरक्षित जागेवर असलेली अतिक्रमणे नियमित होऊच शकत नाहीत. तरीही तावडे हॉटेल परिसरात अतिक्रमण करून बांधलेल्या इमारतींना अभय दिले जात आहे. उच्च न्यायालयाने महापालिकेची जागा असल्याचे स्पष्ट केले असूनही केवळ पोलिस बंदोबस्त नाही म्हणून अतिक्रमण हटाव कारवाई थांबविणे संशयास्पद आहे. आयुक्‍तांवर राजकीय दबाव असल्यास त्यांनी तो झुगारून कारवाई करणे अपेक्षित आहे.

कोल्हापुरात कोणाला तरी खूश करण्यासाठी अतिक्रमणाच्या लहानसहान कारवाई होत असतात. परंतु, ज्यांच्याकडे राजकीय ताकद नाही किंवा ज्यांना अर्थकारणाचे खेळ करता येत नाही, अशांवर अतिक्रमण हटावची कारवाई सुरू असते. तावडे हॉटेल परिसरातील अतिक्रमणे ही धनदांडग्यांची असल्याने त्यांना सवलत दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. आंदोलनात शिवसेना शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस, उपजिल्हा प्रमुख सुजित चव्हाण, राजू यादव, विनोद खोत, विराज पाटील आदींसह इतर सहभागी होते.  

Tags : Kolhapur, Bombay High Court, directs, place, Tawde hotel, area, Kolhapur, Gandhinagar, road,  municipal corporation.