Sun, Aug 25, 2019 23:28होमपेज › Kolhapur › प्रदीर्घ चंद्रग्रहणाचा सामाजिक स्वास्थ्यावर परिणाम

प्रदीर्घ चंद्रग्रहणाचा सामाजिक स्वास्थ्यावर परिणाम

Published On: Jul 25 2018 1:37AM | Last Updated: Jul 25 2018 12:16AMशुक्रवार दि. 27 जुलै रोजी रात्री 11 वाजून 54 मिनिटानी खग्रास चंद्रग्रहण सुरू होते व 28 जुलैच्या पहाटे 2 वाजून 44 मिनिटांनी ते सुटते. पहाटे 3 वाजून 49 मिनिटांनी मोक्ष आहे. ग्रहण पर्व काळ 3 तास 55 मिनिटे एवढा आहे. प्रत्यक्ष ग्रहण 103 मिनिटे असून या शतकातील ते सर्वात प्रदीर्घ ग्रहण आहे. ज्योतिष शास्त्रानुसार रवी आणि राहु हे पुष्प नक्षत्राच्या तिसर्‍या चरणावर असताना आणि चंद्र उतराषाढा व नंतर श्रवण नक्षत्रात असताना आणि केतू श्रवण प्रथम चरणात असताना हे ग्रहण होत आहे. ज्योतिष शास्त्रात चंद्र हा मनाचा कारक मानला गेला आहे. त्यामुळे चंद्र या ग्रहणाचा परिणाम मानवी समूहमनावर होऊ शकतो. सामाजिक अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता आहे. सामाजिक प्रक्षोभाची शक्यता आहे. कर्क रास ही जनसमूहाशी व लोक मानसाशी निगडित असल्याने हे अनुभव येण्याची शक्यता आहे.

याच काळात मंगळ ग्रह वक्री आहे. तो पृथ्वीपासून निकट अंतरावर आहे. शनि, नेपचून हे ग्रहही वक्री असून हर्षल 6 ऑगस्टला वक्री होत आहे. पापग्रह वक्री असता अशुभ परिणाम उद्भवतात. 2 ऑगस्टला मंगळाची हर्षलवर दृष्टी असून दोन्ही ग्रहांचा उतराषाढा आणि आश्‍विनी नक्षत्रातून केंद्रयोग होत आहे. या योगावर नैसर्गिक संकटे, अपघात, स्फोटक घटना होऊ शकतात. साथीचे आजार होऊ शकतात. 27 ऑगस्टला मंगळव 6 सप्टेंबरला शनि मार्गी होत आहे. तोपर्यंत व्यक्‍तीगत जीवनात आकस्मिक अडचणी, अडथळे, आजारपण असे योग येऊ शकतात. ज्यांच्या मूळ कुंडलीत रवी-राहु, रवी केतू, शनि-मंगळ, गुरू-राहू अशा युती असतील, त्यांना काही आकस्मिक त्रास उद्भवू शकतो. या काळात काळजी घेणे आवश्यक आहे.

- पं. अभिजित कश्यप