Tue, Mar 26, 2019 23:53होमपेज › Kolhapur › शुभेच्छांच्या वर्षावात ‘सतेज’ लोकोत्सव

शुभेच्छांच्या वर्षावात ‘सतेज’ लोकोत्सव

Published On: Apr 13 2018 1:17AM | Last Updated: Apr 13 2018 12:36AMकसबा बावडा : प्रतिनिधी 

आमदार सतेज पाटील यांच्यावर  वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव झाला. शुभेच्छांच्या वर्षावात   सतेज लोकोत्सव साजरा झाला. शुभेच्छा देण्यासाठी कसबा बावडा येथील  यशवंत निवासस्थानी दिवसभर  नागरिक, कार्यकर्ते, आबालवृद्धांची गर्दी होती. यानिमित्त   जिल्ह्यात विविध स्पर्धा, कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हारतुरे, पुष्पगुच्छ या ऐवजी वह्यांच्या स्वरूपात शुभेच्छा स्वीकारण्याचा उपक्रम यावर्षीही कायम ठेवण्यात आला. याला उदंड प्रतिसाद लाभला. दिवसभरात लाखो वह्या संकलित झाल्या.

सकाळी आठ वाजल्यापासून शुभेच्छा देण्यासाठी गर्दी सुरू होती. आई सौ. शांतादेवी पाटील यांनी आमदार सतेज पाटील यांचे औक्षण केले. त्यानंतर केक कापण्यात आला. यावेळी डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, दैनिक ‘पुढारी’चे व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश जाधव, सौ. वैजयंती पाटील, सौ. प्रतिमा पाटील, सौ. राजश्री काकडे, ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, करण काकडे, तेजस पाटील, देवश्री पाटील आदी उपस्थित होते. यावेळी माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.

निवासस्थानसमोर  उभारलेल्या व्यासपीठावर आमदार पाटील यांनी शुभेच्छा स्वीकारल्या. गुरुवारी  दिवसभरात महापौर स्वाती यवलुजे, आमदार हसन मुश्रीफ, माजी खा. निवेदिता माने, जयवंतराव आवळे,  माजी आमदार प्रकाश आवाडे, दिनकरराव जाधव, के. पी. पाटील,  शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख प्रा. संजय मंडलिक, उपमहापौर सुनील पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. एस. पाटील, पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, सूरज गुरव, तहसीलदार शरद पाटील, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत शिंदे व पदाधिकारी, बाजार समितीचे सभापती कृष्णात पाटील व सर्व संचालक, ‘क्रिडाई’ कोल्हापूरचे अध्यक्ष महेश यादव व पदाधिकारी,  अभिनेते भरत जाधव, दादू चौगुले, विनोद चौगुले, व्ही. बी. पाटील, दिलीप मोहिते, प्रदीपभाई कापडिया, संजय शेटे, उदयानी साळुंखे, करवीर पंचायत समिती सभापती प्रदीप झांबरे, माजी महापौर प्रल्हाद चव्हाण, आर. के. पोवार, भीमराव पोवार, बाबासाहेब पाटील-भुयेकर, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, जनसुराज्यचे विजय जाधव, उद्योगपती सचिन झंवर, तेज घाटगे, अजयसिंह देसाई, गोपाळराव पाटील, कर्णसिंह गायकवाड, राहुल आवाडे, बाळासाहेब कुपेकर, संग्रामसिंह कुपेकर, भैया माने, गणपतराव फराकटे, युवराज पाटील, जयंत पाटील, मधुआप्पा देसाई,  प्रवीणसिंह पाटील,  बी. के. डोंगळे, सरलाताई पाटील, सुलोचना नायकवडी आदींनी शुभेच्छा दिल्या. स्वागत डॉ. संजय पाटील, ऋतुराज पाटील, सौ. प्रतिमा पाटील यांच्यासह कुटुंबीयांनी केले.

माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अहमद पटेल, मोतीलाल व्होरा, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण, खा. राजू शेट्टी, राजीव सातव, आ. जयंत पाटील, माजी खा. सुरेश कलमाडी, कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, उल्हास पवार, राजेंद्र मुळक,  आ. अमित देशमुख, खासदार भावना गवळी, माजी आ. काकासो पाटील, लातूरचे धीरज देशमुख, गुरूदत्त शुगर्सचे अध्यक्ष माधवराव घाटगे आदींनी आमदार पाटील यांना दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.

बावडा डिजिटल फलकांनी बहरला

विविध मंडळे तसेच व्यक्‍तिगत शुभेच्छा फलकांनी कसबा बावडा येथील प्रत्येक गल्ली, चौक सजला होता. वह्या वाटपाच्या विक्रमाची दखल अनेक फलकांवर दिसत होती. चार नंबर फाटकपासून मुख्य मार्गावर जागोजागी स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. 

वाहतुकीची कोंडी

कसबा बावडा येथील यशवंत निवास येथे आमदार सतेज पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. सकाळी 11 वा. नंतर मुख्य रस्त्यावर शुभेच्छा देण्यासाठी येणार्‍यांच्या वाहनामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी झाली. 

लस्सी, रस अन् कलिंगडाचा आस्वाद

वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होती. उन्हामुळे शुभेच्छा देण्यासाठी येणार्‍या कार्यकर्ते, अबाल वृद्ध, महिलांसाठी लस्सी, रस अन् कलिंगडाचा आस्वाद घेण्याची व्यवस्था केली होती.

राजाराम हायस्कूल 51, प्रल्हाद चव्हाण 50 तर नगरसेवकांतर्फे 46 हजार वह्या

कसबा बावडा येथील राजाराम हायस्कूलच्या वतीने 51 हजार, माजी महापौर प्रल्हाद चव्हाण कुटुंबीयांकडून 50 हजार तर कोल्हापूर महानगरपालिकेतील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी 46 हजार वह्या देऊन शुभेच्छा दिल्या.

Tags :  Kolhapur, Birthday, celebration, Satej Patil