Wed, May 22, 2019 22:50होमपेज › Kolhapur › ‘एमपीएससी’साठी आता ‘बायोमेट्रिक’ हजेरी

‘एमपीएससी’साठी आता ‘बायोमेट्रिक’ हजेरी

Published On: Apr 10 2018 1:15AM | Last Updated: Apr 09 2018 10:35PMकोल्हापूर : अनिल देशमुख

राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणार्‍या परीक्षेसाठी उमेदवारांची हजेरी ‘बायोमेट्रिक’ पद्धतीने घेतली जाणार आहे. परीक्षेतील तोतयागिरीला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ऑगस्ट मध्ये होणार्‍या मुख्य परीक्षेपासून या उपक्रमाला प्रारंभ केला जाणार आहे.

राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने विविध पदांसाठी नियुक्त्या करण्यासाठी लेखी परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षेत तोतयागिरी केली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. डमी विद्यार्थी बसवून परीक्षा उत्तीर्ण होण्याचे प्रमाण वाढत असल्याचाही आरोप होत आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर आयोगाने परीक्षेतील तोतयागिरीला आळा घालण्याचा निर्णय घेतला आहे. याकरिता परीक्षेला बसणार्‍या उमेदवारांची हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने निर्णय घेण्यात आला आहे.

आयोगाच्या वतीने होणार्‍या पूर्व परीक्षेसाठी उमेदवारांची संख्या अधिक असते. यावेळी बायोमेट्रिक हजेरी घेणे सध्या शक्य नाही. यामुळे मुख्य परीक्षेसाठी बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी घेण्यात येणार आहे. या निर्णयाची ऑगस्ट महिन्यात होणार्‍या मुख्य परीक्षेला अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया आयोगाने सुरू केली आहे.उमेदवारांचे परीक्षा अर्जासोबत आधारलिंक आहे. यामुळे या उमेदवारांचा डाटा कायम राहणार आहे. निवड झालेल्या उमेदवाराच्या नोकरीच्या ठिकाणीही हाच डाटा देण्यात येणार आहे. यामुळे यापुढे परीक्षेला डमी उमेदवार बसण्याची शक्यता कमी आहे.

Tags : Kolhapur, Bio metric, attendance,  MPSC