Thu, Sep 20, 2018 16:03होमपेज › Kolhapur › सख्ख्या भावांवर कोयत्याने हल्‍ला; दोघा जणांना अटक

सख्ख्या भावांवर कोयत्याने हल्‍ला; दोघा जणांना अटक

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

बदनामी करत असल्याच्या गैरसमजातून सदर बाजारात सख्ख्या भावांवर कोयत्याने हल्‍ला करण्यात आला. यामध्ये रोहित सुनील मोहिते (वय 18), राजेश ऊर्फ आझाद सुनील मोहिते (20) यांच्यासह आजी सुमन पांडुरंग मोहिते (60) यादेखील जखमी झाल्या. याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले.

मोहिते कुटुंबीय कोरगावकर हायस्कूलनजीक राहण्यास आहेत. परिसरातील अनिकेत नावाच्या तरुणाशी रोहित व राजेशचा किरकोळ वाद झाला होता. यापूर्वीही त्यांच्यात हाणामारीचा प्रकार झाला होता. शुक्रवारी सायंकाळी पुन्हा त्यांच्यात वाद झाला. यातून रात्री उशिरा मोहिते बंधूंवर हल्‍ला करण्यात आला. रोहितच्या डोक्यात कोयता लागला, तर राजेशच्या हातावर वार झाला. भांडण सोडविताना आजी सुमन मोहिते याही जखमी झाल्या. याप्रकरणी पिंटू मोरे (35) व भाऊ मोरे (35) या दोघांना शाहूपुरी पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली. तर एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले आहे.