होमपेज › Kolhapur › कुरुंदवाडमध्ये पाईपलाईन गळतीवरुन 'बोंबाबोंब'

कुरुंदवाडमध्ये पाईपलाईन गळतीवरुन 'बोंबाबोंब'

Published On: May 14 2018 2:12PM | Last Updated: May 14 2018 2:07PMकुरुंदवाड : प्रतिनिधी 

कृष्णा नदीतून इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करणार्‍या पाईपलाईनला गळती लागून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. या कृतीच्या निषेधार्थ इचलकरंजी नगरपरिषदेच्या अनागोंदी कारभाराचा भिम कायदा सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बोंब ठोक आंदोलन करत पाईपलाईनच्या फाऊंडेशन (पायाला) चपलाचा हार घालून निषेध व्यक्त केला.

शिरोळ तालुक्यातील दानोळीच्या वारणा नदीतून पाणी मागणार्‍या इचलकरंजीकरांना कृष्णा नदीच्या पाण्याची किंमत नाही दानोळी नदीतून एक थेंबही पाणी इचलकरंजीकरांना देणार नसल्याचे सांगत दानोळी वारणा बचाव कृती समितीला पाठिंबा देत असल्याचे जिल्हाध्यक्ष सुनील कुरूंदवाडे यांनी सांगत इचलकरंजी नगर परिषदेचा निषेध व्यक्त केला यावेळी आयुब पट्टेकरी,इम्तियाज बागवान,  किशोर चव्हाण, बाबुराव कोळीअदि उपस्थित होते.