Mon, Sep 24, 2018 01:59होमपेज › Kolhapur › भालकर टोळीतील सराईतास अटक

भालकर टोळीतील सराईतास अटक

Published On: Apr 17 2018 1:53AM | Last Updated: Apr 17 2018 1:36AMकोल्हापूर : प्रतिनिधी

तडीपार आदेशाचे उल्लंघन करून दौलतनगर परिसरात दहशत माजविणार्‍या येथील गौरव भालकर टोळीतील साथीदाराला राजारामपुरी पोलिसांनी सोमवारी अटक केली. ओंकार विनायक आरगे (वय 23, रा. म्हाडा कॉलनी, शास्त्रीनगर) असे त्याचे नाव आहे.

‘राजारामपुरी’चे सहायक निरीक्षक शहाजी निकम यांनी सोमवारी सकाळी ही कारवाई केली. गर्दी, मारामारीसह अन्य गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईताला दि. 5 एप्रिलला पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार केले होते.आदेशाचा तत्काळ अमंल  झाला होती. तथापि सराईत आरगे काही दिवसांपासून दौलतनगर परिसरात आश्रयाला आला होता. परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती मिळताच शहाजी निकम व पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.आरगेविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असेही निकम म्हणाले.

Tags : Kolhapur, Bhalkar gang, member, arrested