Sun, Nov 18, 2018 20:26होमपेज › Kolhapur › फसवणुकीच्या कॉलपासून सावधान!

फसवणुकीच्या कॉलपासून सावधान!

Published On: Dec 12 2017 2:05AM | Last Updated: Dec 12 2017 12:03AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

मै ...बँक के मुंबई ब्रँच से बात कर रहा हूँ. मुझे आपके बँक के डिटेल चाहिए’, असे संभाषण करून अनेकांच्या बँक खात्याची माहिती घेण्यात सपाटा चालविण्यात आला आहे. अशा फसवणुकीच्या कॉलपासून सावधान होणे गरजेचे आहे.  

यापूर्वी मोबाईलवरून फसवणूक करून सर्वसामान्यांना लुटण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, याविषयी जागृती नसल्याने अनेक याचे बळी पडत आहेत. बँकेकडून  खात्यातील माहिती मागण्यासाठी असे कोणत्याही प्रकारचे संदेश किंवा फोन केला जात नाही. अशा फोनकॉलना प्रतिसाद देऊ नका, असे संदेश नेहमी प्रत्येक बँकेकडून आपल्याला येत असतात. मात्र, याच्याकडे दुर्लक्ष करून अनेकांकडून आपल्या बँक खात्याची माहिती सांगितली जाते. असे न करता कोणतीही समस्या आल्यास थेट बँकेशी संपर्क साधला 

पाहिजे. आज प्रत्येकाकडे एटीएम कार्ड आहे. अनेक जण एटीएम कार्डच्या माध्यमातूनच व्यवहार करत असतात. मात्र, एटीएमबद्दल व पीनबद्दल माहिती फोनद्वारे विचारल्यानंतर आपण सावधानता बाळगणे गरजेचे आहे. आपला अकाऊंट नंबर, एटीएम, एटीएम पासवर्ड याबाबत फोनवरून विचारणा करण्यात आली असेल त कोणीतीही माहिती देऊ नये. जर तुम्ही माहिती दिला तर संबंधित व्यक्‍तीकडून काही सेकंदातच तुमच्या बँक खात्यातील रक्‍कम काढली जाते. आजवर अनेकांना अशा व्यक्‍तींचे फोन आलेले आहेत.