Wed, Jul 17, 2019 00:07होमपेज › Kolhapur › शाकाहारी हॉटेलमध्ये बार

शाकाहारी हॉटेलमध्ये बार

Published On: Dec 10 2017 1:19AM | Last Updated: Dec 10 2017 12:37AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी 

महावीर गार्डननजीक शाकाहारी हॉटेल म्हणून चालविण्यात येणार्‍या साईनाथ हॉटेलवर शाहूपुरी पोलिसांनी शुक्रवारी रात्री छापा टाकला. याठिकाणी दारू पिणार्‍या 22 तरुणांना रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी मालकीन निर्मला परदेशी व कामगार इरफान मिरासो नदाफ (वय 22, रा. साईनाथ कॉलनी, कसबा बावडा) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. 

हॉटेलमध्ये विनापरवाना काही तरुण दारू पिण्यास बसल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी कारवाई केली. बहुतांशी तरुण हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असल्याची माहिती पुढे आली आहे. शुद्ध शाकाहारी जेवण मिळेल असा बोर्ड लिहून छुप्या पद्धतीने दारू पिण्यास परवाना दिल्याबाबत हॉटेल परवाना रद्द करण्याची कारवाई करणार असल्याचेही शहर उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी सांगितले.