Wed, Feb 20, 2019 16:51होमपेज › Kolhapur › रेंदाळ येथे घशात केळे अडकून बालकाचा मृत्यू 

रेंदाळ येथे घशात केळे अडकून बालकाचा मृत्यू 

Published On: Feb 23 2018 1:19AM | Last Updated: Feb 23 2018 12:37AMरेंदाळ : वार्ताहर

रेंदाळ येथे दीड वर्षाच्या मुलाच्या घशात केळे अडकल्यामुळे श्‍वास गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला. कार्तिक प्रशांत नेजे असे त्या बालकाचे नाव आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्‍त होत आहे.

प्रशांत नेजे यांचा पॉवरलूमचा व्यवसाय आहे. गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास कार्तिकची आई त्याला केळे भरवत होती. त्यावेळी कार्तिकने केळे हिसकावून घेतले व स्वतः खाण्यास सुरुवात केली. दुर्दैवाने केळे घशातच अडकले. श्‍वासनलिकेला केळे चिकटल्याने गुदमरून कार्तिकचा मृत्यू झाला. एकुलता एक मुलगा आकस्मिक गेल्याने आई, वडिलांनी मोठा आक्रोश केला.