Wed, Sep 19, 2018 20:26होमपेज › Kolhapur › पुस्तकांसह माणसेही वाचता आली पाहिजेत : जोंधळे 

पुस्तकांसह माणसेही वाचता आली पाहिजेत : जोंधळे 

Published On: Jan 09 2018 1:33AM | Last Updated: Jan 08 2018 11:18PM

बुकमार्क करा
आजरा : प्रतिनिधी

माणुसकी हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे, पुस्तके आणि माणसे आपण वाचावयास शिकले पाहिजे. स्वतःच्या प्रगतीकरिता वाचन हे आवश्यक आहे. शालेय मुलींनी सावित्रीबाई फुले आणि कल्पना चावला अशा थोर महिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मोठे होण्याची जिद्द वाढवली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिका इंदुमती जोंधळे यांनी केले. चैतन्य सृजन व सेवा संस्थेच्या वतीने आयोजित बालिका साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या.

सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करण्यात आले. मंजिरी यमगेकर यांनी  प्रास्ताविक केले. संस्थेच्या साहित्यिक व सांस्कृतिक उपक्रमांचा आढावा त्यांनी घेतला. 

संमेलनाच्या स्वागताध्यक्षा शीतल हरेर यांनी संमेलनाच्या आयोजनाचा हेतू स्पष्ट केला. नसिमा जमादार, अर्चना सावंत, सुचिता घोरपडे, ऋतुजा फुलकर आदींनी कवितांचे वाचन केले. कथाकथनाच्या सत्रामध्ये पुष्पा वाघराळकर, निलीमा माणगावे यांनी कथांचे सादरीकरण केले. तर श्रृती जाधव, अपुर्वा बागडी, समिक्षा सावरतकर, आदिती बाचुळकर यांनी आपल्या कथा सादर केल्या. संमेलनप्रसंगी सरिता फडके यांच्या चित्रांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. 

यावेळी प्राची मायदेव, डॉ. शिवशंकर उपासे, ज्येष्ठ साहित्यिक राजाभाऊ शिरगुप्पे, एम. एल. चौगुले, भगवान पोवार व मान्यवर उपस्थित होते.