Sat, Jul 04, 2020 09:12होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : कोरोनातही भाजपची अखंड समाजसेवा

कोल्हापूर : कोरोनातही भाजपची अखंड समाजसेवा

Last Updated: May 27 2020 1:23PM
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाच्यामहामारीतही भारतीय जनता पक्षाने आपली सामाजिक सेवेची बांधिलकी अखंडपणे जोपासली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आम. चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर महानगर जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांचे त्यांना मोलाचे सहकार्य मिळत आहे.

5 हजार धान्याची किट वाटप

 कोल्हापूर महानगर भाजपच्या वतीने शहरातील गोरगरीब व गरजूंना 5 हजारांवर जीवनावश्यक धान्याच्या किटचे वाटप करण्यात आले आहे. यात कष्टकरी, फेरीवाले, मोलमजुरी करून कुटुंबाचा उदनिर्वाह करणारे, रिक्षाचालक यांच्यासह गोर गरीब व गरजू आदींचा समावेश आहे.

पाच रुपयांत चपाती-भाजी....

भारतीय जनता पक्ष व संवेदना फाऊंडेशनच्यावतीने पाच रुपयांत चपाती-भाजी हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. कोरोनामुळे संचारबंदी असल्यामुळे बेघर, आजारी, वृद्ध, बेरोजगार कामगार, गरीब, स्थलांतरित लोकांना या माध्यमातून अगदी अल्प दरात आणि काहींना मोफत जेवण पुरविण्यात येत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांच्या प्रेरणेतून व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली या सर्व दुर्लक्षित घटकांसाठी पाच रुपयांत चपाती-भाजी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संवेदना फाऊंडेशनचे अध्यक्ष व भाजप जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी कोल्हापूर शहरात हा उपक्रम 81 प्रभागात राबविला. 15 हजारांहून गरजूंनी त्याचा लाभ घेतला.

व्यापार्‍यांसाठीही पुढाकार...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देऊन सर्वच राज्यांनी उत्तम सहकार्य केले. कोल्हापुरात जिल्हा पोलिस प्रशासन, महापालिका प्रशासनाने घेतलेल्या ठोस निर्णयामुळे परिस्थिती चांगल्या प्रकारे नियंत्रणात आहे. या पोर्शभूमीवर भाजीपाला विक्रेते, किराणा माल दुकानदार, पार्सल देणारे, उपहारगृहे यांच्यासह सर्व व्यापारी, व्यावसायिकांसाठी नियमावली तयार व्यापारास परवानगी होती. परंतु पोलिस प्रशासन त्यांना व्यवसाय बंद करण्यास भाग पाडत होते. अनेक व्यापार्‍यांनी भाजप कार्यालयाशी संपर्क साधल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांना निवेदन दिले. त्यानंतर पोलिसांनी सहकार्याची भूमिका स्वीकारली. परिणामी व्यापार, व्यावसायिकांना वेळेची व दुकानावर कारवाईची पोलिसांकडून कारवाईची भीती दूर झाली. 

सीपीआरला 1 हजार एन-95 मास्क

संवेदना सोशल फाऊंडेशन कोल्हापूरच्या वतीने आम. चंद्रकांत  पाटील यांच्या प्रेरणेतून सीपीआर येथे कार्यरत असणार्‍या डॉक्टर्सना अत्यावश्यक एन 95 प्रकारचे 2,36,250 रु. किमतीचे 1000 मास्क भाजपचे जिल्हा अध्यक्ष राहूल चिकोडे यांनी अधिष्ठाताडॉ. मिनाक्षी गजभिये यांच्याकडे प्रदान केले. त्याबरोबरच काही लोक तोंडाला रूमाल, ओढणी, कापड बांधून फिरताना दिसत होते.

25 हजार कापडी मास्क वाटप

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्याच्या काळजीच्या दृष्टीने मास्कची गरज असल्याचे ओळखून शहरात कापडी मास्कचे वितरणही करण्यात आले. शहरात ठिकठिकाणी तब्बल 25 हजारांहून जास्त मास्क वाटप करण्यात आले. तसेच 5 हजार सॅनिटाईझरच्या बाटल्या वाटप केल्या. 

मोफत आरोग्य सेवा

भाजपच्या वतीने कोल्हापूर शहरातील प्रत्येक वॉर्डमध्ये एक डॉक्टरच्या माध्यमातून मोफत आरोग्य सेवा देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. स्थानिक वॉर्डमधील एखादी व्यक्‍ती किरकोळ आजारी (सर्दी,ताप, खोकला, व्हायरल इन्स्पेक्शन) असल्यास त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना योग्य ती औषधे, इंजेक्शन आदी सेवा मोफत पुरविण्यात येत आहे. 

विद्युत उपकरणांची मोफत दुरुस्ती

लॉकडाऊनच्या काळात नादुरूस्त घरगुती विद्युत उपकरणे दुरूस्तीसाठी कोण मिळत नव्हते. परिणामी भाजपच्या वतीने नागरिकांना बंद पडलेली घरगुती उपकरणे मोफत दुरूस्त करून देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. एक आठवडा राबविण्यात आलेल्या उपक्रमात पाचशेच्यावर नागरिकांनी उपकरणे दुरूस्त करून घेतली. यात फॅन, कुलर, मिक्सरसह इतर उपकरणांचा समावेश आहे. 

पुण्यातून विद्यार्थी कोल्हापुरात..

कोल्हापुरातील अनेक विद्यार्थी पुण्यात शिक्षण घेत आहेत. लॉकडाऊनच्या कालावधीत ते पुण्यात अडकले होते. आम. चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून दोन बसेस भरून 50 विद्यार्थ्यांना कोल्हापुरात आणण्यात आले. सीपीआरमध्ये सर्वांची तपासणी करण्यात आली.

स्वच्छता कर्मचार्‍यांना मोफत विमा

कोरोना लढाईचे अग्रदूत असलेल्या महापालिका स्वच्छता कर्मचार्यांचा आरोग्य विमा उतरून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्‍त करण्यात आली आहे. 32 कर्मचार्‍यांचा आरोग्य विमा उतरविण्यात आला आहे.