Sat, Jul 20, 2019 11:24होमपेज › Kolhapur › आजरा नगरपंचायत निवडणूक हालचाली गतिमान

आजरा नगरपंचायत निवडणूक हालचाली गतिमान

Published On: Jan 15 2018 1:48AM | Last Updated: Jan 14 2018 10:25PM

बुकमार्क करा
आजरा : प्रतिनिधी

आजरा नगरपंचायत निवडणूक पार्श्‍वभूमीवर पक्षीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या असून, रविवारी आजरा येथे पार पडलेल्या भाजप व मित्रपक्षांच्या बैठकीत समविचारी आघाडी करून सर्वांना सोबत घेऊन निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेण्यात आला. आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष अशोक चराटी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.  स्वागत विजयकुमार पाटील यांनी केले. ते म्हणाले, आगामी नगरपंचायत निवडणुकीला कोणत्या पद्धतीने सामोरे जावे लागेल याचा आढावा घेतला.

अशोक चराटी म्हणाले, निवडणुकीला सर्वांना सोबत घेऊन जावे लागेल. प्रभागवार दहाजणांच्या समित्या नेमून उमेदवार निश्‍चिती केली जाईल. भाजप तालुकाध्यक्ष अरुण देसाई म्हणाले, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार स्थानिक नगराध्यक्षपदाची निवडणूक ही भाजपच्या चिन्हावर लढवावी लागण्याची शक्यता आहे. नगराध्यक्षपदाचा उमेदवार देत असताना तो सक्षम असावा याची काळजी घ्यावी, अशी सूचना जनार्दन टोपले यांनी केली. तर पक्ष देईल त्या उमेदवाराच्या व पक्षाच्या निर्णयाशी आपण बांधील असल्याचे बापू टोपले यांनी सांगितले. यावेळी विलास नाईक, विजय थोरवत, बाळ केसरकर, हसन शेख, प्रभाकर कोरवी आदींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन भय्या टोपले यांनी केले. आभार अनिल देशपांडे यांनी मानले.