Sat, Mar 23, 2019 16:07होमपेज › Kolhapur › अविनाश पाटील नगराध्यक्ष चषकाचा मानकरी

अविनाश पाटील नगराध्यक्ष चषकाचा मानकरी

Published On: Feb 12 2018 1:53AM | Last Updated: Feb 11 2018 11:03PMहुपरी : वार्ताहर 

हुपरीचे ग्रामदैवत श्री अंबाबाई मातेच्या यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती मैदानात मोतीबागच्या अविनाश पाटील याने लपेट डावावर विक्रम शेटे याला  चितपट करून मानाचा नगराध्यक्ष चषक पटकावला तर महिलांच्या कुस्तीत प्रतीक्षा बागडी हिने स्वाती पाटील हिच्यावर मात करून उपनगराध्यक्ष चषक पटकावला. या रोमहर्षक कुस्त्या पाहण्यासाठी 10 हजारांहून अधिक कुस्ती शोकिनांनी गर्दी केली होती.

मंदिर परिसरातील भव्य मैदानावर या कुस्त्या झाल्या सपोनि नामदेव शिंदे, अभय पाटील,  मनोज चौगुले, यशवंतराव पाटील, माजी जि. प. अध्यक्ष नानासाहेब गाठ, नेताजी निकम, घनश्याम माळी आदींच्या उपस्थितीत मैदानाचे पूजन झाले. नगराध्यक्षा जयश्री महावीर गाट, माजी खासदार जयवंतराव आवळे, उपनगराध्यक्ष जयकुमार माळगे, माजी आमदार राजीव आवळे,  महावीर गाठ, मुख्याधिकारी तानाजी नरळे, पक्षप्रतोद भरत लठ्ठे,   आदी उपस्थित होते.

 पंच म्हणून मोहन नाईक, नेताजी निकम, राजाराम गायकवाड, तुकाराम गिरी, दत्ता सव्वाशे, घनश्याम माळी, संभाजी गिरी, नामदेव पाटील, राहुल गाठ, धनाजी खेमलापुरे, घनश्याम गायकवाड, सुभाष वाईंगडे, जयराम गायकवाड, मौला कलावंत, विक्रम काटकर यांनी काम पहिले. कुस्त्या पाहण्यासाठी गॅलरीची व्यवस्था करण्यात आली होती. यात्रा समितीचे कार्याध्यक्ष यशवंतराव पाटील व समिती सदस्यांनी नेटके नियोजन केले होते. यावेळी सुकुमार माळी, मोहनराव जाधव यांनी सूत्रसंचालन केले. 

मैदानातील विजेते मल्ल असे : शुभम सिधनाळे, अजित पाटील, ऋषिकेश पाटील, सौरभ पाटील, ओंकार लाड, शाहरुख मुजावर, विनायक उगळे, अवधीत गोंधळी, इंद्रजित नाईक, अक्षय देसाई, योगीराज वाईंगडे, धेर्यशील नाईक, श्रेयस गाट. 
महिला कुस्तीतील विजेत्या : स्मिता माळी, साक्षी चौगुले, अनुजा मगदूम, अंकिता पाटील, सोनाली बागडी  आभार यशवंतराव पाटील यांनी मानले.