Wed, Jun 03, 2020 07:48होमपेज › Kolhapur › साखर कारखान्यांचा संघटित कायदेभंग!

साखर कारखान्यांचा संघटित कायदेभंग!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कुडित्रे : प्रतिनिधी

चालू हंगामात उसाच्या वजन वाढीबरोबर कारखान्यांचे सरासरी साखर उतारे अर्धा ते टक्क्यांहून अधिक आहेत. त्यामुळे कारखानदार मालामाल झाले आहेत. याचा परिणाम पुढील हंगामातील एफ.आर.पी. वाढण्यावर होणार आहे. या हंगामातील बिल देताना मात्र कारखानदारांनी एफ.आर.पी. चीच मोडतोड केल्याने ऊस उत्पादक मात्र कंगाल झाले आहेत.

कुणाची एफ.आर.पी. किती?

जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा 12.33 टक्के (2016-17 च्या हंगामाचा) आहे. सरासरी तोडणी वाहतूक खर्च 578 रुपये आहे. सरासरी 3308 रुपये एफ.आर.पी.तून तोडणी वाहतूक खर्च वजा जाता प्रतिटन 2780 रुपये वैधानिक पहिली उचल आहे. तात्यासाो कोरे वारणा (2707), पंचगंगा (2753), कुंभी कासारी (2882), बिद्री (2835), भोगावती (2713), दत्त शिरोळ (2803), दौलत (2304), गडहिंग्लज (2509), शाहू कागल (2783), जवाहर (2791), राजाराम बावडा (2709), आजरा (2355), गायकवाड(2573), मंडलिक (2652), शरद नरंदे (2804), इंदिरा गांधी महिला (2213), डॉ. डी. वाय. पाटील (2702), डालमिया आसुर्ले (2773), गुरुदत्त टाकळी (2954), नलवडे शुगर्स (2489), हेमरस (2592), महाडिक शुगर्स (2461), सरसेनापती घोरपडे (2564), कोल्हापूर जिल्हा सरासरी 2730 याप्रमाणे एफ.आर.पी. आहे. या कारखान्यांनी एफ.आर.पी. दिली आहे. 

डिसेंबर 17 पासून अनेक कारखान्यांनी गट्टी करूरन प्रतिटन 2500 रुपयांप्रमाणे उचल दिली आहे. म्हणजे या कारखान्यांनी प्रतिटन 230 रुपये एफ.आर.पी. थकवली आहे. दौलत, आजरा, इंदिरा गांधी महिला, या कारखान्यांची एफ.आर.पी. 2500 हून कमी आहे. 

हंगाम अंतिम टप्प्यात असताना दिली बगल

साखरेचे दर पडलेत. आम्ही एफ.आर.पी.च देणार अशी गर्जना करणारे कारखानदार उसाच्या टंचाईच्या भीतीने व कर्नाटकात ऊस जातोय म्हटल्यावर एफ.आर.पी. अधिक 100 आता व दोन महिन्यांनंतर 100 या स्वयंघोषित सूत्रावर सहमत झाले. यावर कडी म्हणजे काही कारखान्यांनी एफ.आर.पी. अधिक 100 एकदम दिले. हंगाम अंतिम टप्प्यात असताना एफ.आर.पी.ला बगल देत प्रतिटन 2500 रुपये देण्याबाबत गट्टी केली आहे. या आरडाओरडीत सहकारी साखर कारखानेच आघाडीवर आहेत. जे खासगी कारखाने रीतसर ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार उचल देत आहेत, त्यांनाही या गट्टीत ओढले आहे आणि हा संघटित कायदेभंग ऊस उत्पादकांना रुचलेला नाही.

 

Tags : kolhapur, kolhapur news, sugar, sugar factory, 


  •