Fri, Nov 16, 2018 07:44होमपेज › Kolhapur › जयसिंगपुरात महिलेच्या मृत्यूप्रकरणी पती - भावाचे शोले स्टाईल आंदोलन 

जयसिंगपुरात महिलेच्या मृत्यूप्रकरणी पती - भावाचे शोले स्टाईल आंदोलन 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

जयसिंगपूर : प्रतिनिधी

दवाखान्यात कामावर असताना मृत्यू झालेल्या स्वाती प्रदीप भोरे यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी डॉ. ए. एस. पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा, या मागणीकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ त्यांचा भाऊ सतीश भोरे व पती प्रदीप भोरे यांनी येथे भाजी मंडईतील पाण्याच्या टाकीवरून उडी मारण्याचा प्रयत्न केला. 

सकाळी 11 ते दुपारी साडेबारापर्यंत शोले चित्रपटाला शोभेल अशा आंदोलनामुळे पोलिस यंत्रणेची तारांबळ उडाली. पाण्याच्या टाकीवरून खाली येण्याची विनंती दोघांनी धुडकाविली. दोन-तीनवेळा सतीश भोरे याने टाकीवरून उडी मारण्याचा प्रयत्न केला. माझ्या मृत्यूला सर्वस्वी पोलिस खाते जबाबदार राहील. सक्षम अधिकारी नाहीत, असे सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कदम सांगतात. माझी बहीण मेली त्याला जबाबदार कोण, आमच्या मागणीकडे टाळाटाळ सुरू आहे, असा आरोप सतीश भोरे यांनी करून आत्मदहनाचा इशारा दिला. दहा मिनिटांची मुदत देतो, सक्षम अधिकार्‍याला बोलवा, असा इशारा दिला.

यावेळी कदम यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक किरण दिडवाघ व पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल होते. या अनपेक्षित आंदोलनामुळे नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. सतीश भोरे यांच्या आई व पत्नी दोघीही उपस्थित होत्या.नगराध्यक्ष  डॉ. नीता माने, नगरसेवक  पराग पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. खाली येण्याची दोघांचीही विनंती सतीश भोरे याने धुडकाविली. पराग पाटील यांच्या निवासस्थानी नगराध्यक्षांच्या उपस्थितीत बैठक झाली. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्याचे यावेळी ठरले. 

Tags : Kolhapur, kolhapur News, Attempt, jump, water tank, vegetable market.


  •