Sun, Jul 21, 2019 12:00होमपेज › Kolhapur › अल्पवयीन मुलीवर अत्याचार; एकास अटक

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; एकास अटक

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

रेंदाळ : वार्ताहर

हातकणंगले तालुक्यातील रांगोळी येथे दुसरीत शिकणार्‍या सात वर्षांच्या शाळकरी मुलीवर नात्यातील एकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. याप्रकरणी पोपट सदाशिव घराळ (वय 50, रा. रांगोळी, मुल्लाणीवाडी) याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून, संशयितास शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी (दि. 26) हा प्रकार घडला.

दरम्यान, घराळ यास न्यायालयात  हजर केले असता त्यास 2 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली. घराळ याच्या सुनेच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम असल्याने पीडित मुलीचे आई, वडील, आजी रांगोळीतील मुल्लाणीवाडी येथे गेले होते. घराळ दारू पिऊन घरात झोपला होता.

पीडित मुलीस संशयिताजवळ झोपविले होते. त्यावेळीच हा घृणास्पद प्रकार घडला. घटनेनंतर मुलीस खासगी दवाखान्यात  नेण्यात आले. संशयिताने मुलीचे तोंड दाबून धरल्याचे नातेवाइकांनी सांगितले. दोन दिवसांनंतर मंगळवारी रात्री पीडित मुलीच्या आजीने तक्रार दिली. त्यानंतर  घराळ याला अटक केली.