Sun, Jun 16, 2019 02:12होमपेज › Kolhapur › अथणी शुगर्स प्रशासन-कामगार वाद विकोपाला

अथणी शुगर्स प्रशासन-कामगार वाद विकोपाला

Published On: Mar 24 2018 1:48AM | Last Updated: Mar 24 2018 12:35AMगारगोटी : प्रतिनिधी

तांबाळे येथील इंदिरा गांधी भारतीय महिला साखर कारखान्याच्या रस्त्याला जमिनी दिलेल्या कामगारांना अथणी शुगर्सच्या प्रशासनाने कामावरून कमी केल्यामुळे कामगारांचा उद्रेक झाला आहे. कारखान्याकडे जाणारा मुख्य रस्ता खोदून बंद केला आहे. त्यामुळे कारखान्याकडे होणार्‍या वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे. कारखाना स्थळावर कामगारांचे कुटुंबीयांसह आंदोलन सुरू आहे.  अथणी शुगर्स प्रशासन व कामगार यांच्यातील वाद आता  विकोपाला गेला आहे. 

महिला साखर कारखान्याचा ताबा आयडीबीआय बँकेने अथणी शुगर्सला दिला आहे. याबाबतचा दावा पुणे येथील डीआरटी न्यायालयात सुरू आहे. अथणी शुगर्सने दुसरा गळीत हंगाम घेतला आहे. या दरम्यान अथणी प्रशासन आणि कारखान्याला जमिनी देणार्‍या कामगारांच्या सतत वाद सुरू आहे. गळीत हंगाम संपताच  काही कर्मचार्‍यांना कामातून मुक्‍त करण्याची  यादी कारखाना कार्यस्थळावर अथणी शुगर्स प्रशासनाने लावून कामगारांना धक्‍काच दिला. त्यामुळे संतप्त कामगारांनी कारखाना प्रशासनाला  धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे.

कारखान्याकडे जाणारा मुख्य रस्ता गेल्या चार दिवसांपासून खोदून बंद केला आहे. त्यामुळे कारखान्याच्या वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली आहे. अथणी शुगर्स प्रशासन आणि जमीनदार कामगार यांच्यातील वाद चांगलाच विकोपाला गेला आहे. झित्रेवाडी येथील जमीनदार कामगारांनी कुटुंबीयांसह आंदोलन सुरू केले आहे. कारखाना प्रशासनाने जमीनदार कामगारांवर मोठा अन्याय केला आहे, अशा भावना व्यक्‍त केल्या आहेत. 

Tags : Kolhapur, Kolhapue News ,Athani Sugars Administration, Workers, conflict, Issue