Sun, Oct 20, 2019 01:06होमपेज › Kolhapur › अटल फुटबॉल चषक : खंडोबाची दिलबहारवर मात

अटल फुटबॉल चषक : खंडोबाची दिलबहारवर मात

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन

कोल्हापूर येथील शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या अटल चषक फुटबॉल स्पर्धेत खंडोबा तालीम मंडळ (ब) विरुध्द दिलबहार तालीम मंडळ (ब)  यांच्यातील सामन्यात कपिल शिंदेच्या गोलच्या जोरावर खंडोबाने दिलबहारवर १-० ने मात केली. पुढारी वृत्तसमूहाचे टोमॅटो एफएम या स्पर्धेचे माध्यम प्रायोजक आहे. 

 दोन्ही संघांनी आक्रमक सुरुवात केली. त्यांनी प्रतिस्पर्धी संघाच्या गोलपोस्टमध्ये जोरदार चढाया केल्या. हाफ टाईमोपर्यंत खंडोबा आणि दिलबहार यांनी आक्रमक खेळ केला. यात खंडोबाच्या कपिल शिंदेने गोल करत खंडोबाचे खाते उघडले. त्यानंतर दिलबहारने गोलची परतफेड करण्यासाठी जोरदार चढाया सुरु केल्या. पण, त्यांना गोल करण्यात अपयश आले. सामना संपताना खेलाडूंनी पंचांचा निर्णय पटला नाही त्यामुळे हुज्जत घातली त्यामुळे सामना काहीकाळ थांबला होता.   

सामनावीराचा पुरस्कार खंडोबाच्या कपिल शिंदेला देण्यात आला. 

लाईव्ह अपडेट : 

*खंडोबाचे आक्रमण, गोल करण्यात अपयश 

*खेळाडूंची पंचांच्या निर्णयावरुन हुज्जत, खेळ थांबवण्यात आला  

*दिलबहारकडून आक्रमक खेळ

*हाफटाईमला खंडोबाची १-० ने आघाडीवर 

*सामन्याची उत्कंठा शिगेला 

*दोन्ही संघांकडून आक्रमक खेळाचे प्रदर्शन 

*खंडोबाचा आक्रमक खेळ 

* खंडोबाच्या कपिल शिंदेचा गोल, खंडोबा १-० ने आघाडीवर 

*खंडोबा तालीम मंडळ विरुध्द दिलबहार तालीम मंडळ सामन्यास सुरुवात


  •