Sun, Mar 24, 2019 06:16होमपेज › Kolhapur › मार्चअखेर काळम्मावाडी धरणात 53.79 टक्के पाणीसाठा 

मार्चअखेर काळम्मावाडी धरणात 53.79 टक्के पाणीसाठा 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

काळम्मावाडी : वार्ताहर 

दूधगंगानगर (ता. राधानगरी) येथील राजर्षी शाहूसागरात चालू वर्षात मार्चअखेरीस 53.79 टक्के पाणी उपलब्ध असल्याने दूधगंगा नदी काठावर पाणी समस्या निर्माण होणार नाही. 31 मार्चअखेर धरण परिसरात 3088 मी. मीटर पाऊस झाला आहे.

मार्चअखेर धरणाची पाणी पातळी 634.86 मीटर तर पाणीसाठा 386.858 द. ल. घ.मी (13.66 टी.एम.सी.) म्हणजेच 53.79 टक्के इतका उपलब्ध आहे. सन 2017 ला धरण परिसरात 2890 मि. मीटर इतका पाऊस झाला होता. तर 31 मार्च अखेर जलाशयाची पातळी 633.35 मीटर होती. पाणीसाठा 350.681 द.ल.घ.मी (12.38 टीएमसी) म्हणजेच 48.76 टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. गतसालापेक्षा चालू वर्षात पाणीसाठा अधिक असल्याने दूधगंगा नदी तीरावर पाणी समस्या जाणवणार नाही. आज दूधगंगा धरणाच्या जलविद्युत केंद्रातून डाव्या कालव्यातून 800 क्युसेकने, उजव्या कालव्यातून 475 क्युसेकने तर नदीपात्रात 200 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे.

दूधगंगा डावा आणि उजवा कालव्यातून मागणीनुसार पाणी सोडण्यात आले असून पाण्याच्या सुक्ष्म नियोजनानुसार दूधगंगा काठावर पाणी समस्या निर्माण होणार नाही. तर 15 जूननंतर काळ्म्मावाडी धरणात जवळपास 5 ते 7 टी. एम. सी. पाणीसाठा शिल्लक राहणार आहे, असे सहायक अभियंता एम. एम. टिटवाडकर यांनी 
सांगितले.

Tags : Kolhapur, Kolhapur News, March, 53.79 percent, water stock, Kalammawadi dam


  •