Mon, Mar 25, 2019 09:08होमपेज › Kolhapur › केंद्रात भाजपचे नव्हे तर ‘आरएसएस’चे पेशवाई सरकार : जोगेंद्र कवाडे

केंद्रात भाजपचे नव्हे तर ‘आरएसएस’चे पेशवाई सरकार : जोगेंद्र कवाडे

Published On: Feb 27 2018 2:04AM | Last Updated: Feb 27 2018 12:42AMरूकडी : वार्ताहर

संपूर्ण महाराष्ट्र बंद शांततेत पार पडला असताना काही जातीयवादी पेशव्यांनी महाराष्ट्रात विविध ठिकाणी जातीय दंगली घडवून आणल्या. यामध्ये बहूजन समाजातील लोकांचे अतोनात नुकसान झाले. अनेक निष्पाप तरुणांवर गुन्हे दाखल झाले. केंद्रात आणि राज्यात शिवसेना-भाजप सरकार नाही तर आरएसएसचे पेशवाई सरकार आहे. पेशवाई रोखण्यासाठी बहुजन समाजातील लोकांनी एकजूट दाखवणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पिपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी केले. 

भीमा कोरेगाव घटनेच्या पार्श्‍वभूमीवर प्रा. कवाडे यांनी संपूर्ण महाराष्ट्र दौरा काढला आहे. या दरम्यान त्यांनी रूकडी गावातील  बौद्ध समाजास नुकतीच भेट देऊन विचारपूस केली. त्यावेळी ते बोलत होते. माजी सरपंच नंदकुमार शिंगे व के.डी.चव्हाण यांनी स्वागत केले. काही माथेफिरू लोकांनी दंगल घडवून आणली. त्यांच्यावर गुन्हे दाखल न करता अनेक निष्पाप तरुणांवर गुन्हे दाखल झाले. त्यामुळे हल्लेखोरांना अटक करून रूकडीसह महाराष्ट्रातील निष्पापांवरील गुन्हे रद्द करण्यात यावेत, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे प्रा. कवाडे यांनी सांगितले.  यावेळी येथील बौद्ध समाजाच्या वतीने या संदर्भातील निवेदन प्रा. कवाडे यांना देण्यात आले. यावेळी विलास गायकवाड, अविनाश साकेत, संतोष रूकडीकर, विजय चव्हाण, सुनील गायकवाड, लताताई कांबळे आदी उपस्थित होते.