होमपेज › Kolhapur › अश्‍विनी बिंद्रे बेपत्ताप्रकरणी कुरूंदकरच्या चालकास अटक

अश्‍विनी बिंद्रे बेपत्ताप्रकरणी कुरूंदकरच्या चालकास अटक

Published On: Feb 21 2018 1:12AM | Last Updated: Feb 21 2018 1:12AMकोल्हापूर : प्रतिनिधी

महिला पोलिस अधिकारी अश्‍विनी बिंद्रे बेपत्ताप्रकरणी नवी मुंबई क्राईम ब्रँचने मुख्य संशयित व तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरूंदकर याचा चालक कुंदन भंडारीला मंगळवारी सायंकाळी भाईंदर येथून अटक केली.

तपासाधिकारी अल्फान्सो यांनी ही कारवाई केली. भंडारीवरील कारवाईमुळे या प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या तीन झाली आहे. यापूर्वी अभय कुरूंदकर, राजेश पाटील यांना अटक झाली आहे. पोलिस अधिकारी बिंद्रे 11 एप्रिल 2016 मध्ये मुंबईतील कळंबोली येथून बेपत्ता झाल्या होत्या. 31 जानेवारी 2017 मध्ये कळंबोली पोलिस ठाण्यात संशयित अभय कुरूंदकरविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. पती राजू गोरे, भाऊ आनंद बिंद्रे यांनी न्यायालय व शासनस्तरावर सतत पाठपुरावा केल्यामुळे अभय कुरूंदकर पाठोपाठ भाजपच्या एका बड्या नेत्याचा भाचा असलेल्या राजेश पाटीलला पोलिसांनी अटक केली होती. भंडारीला अटक झाल्याने या प्रकरणातील नेमके गूढ उकलेल, असा विश्‍वास तपासाधिकार्‍यांनी व्यक्‍त केला.