Wed, Feb 19, 2020 09:19होमपेज › Kolhapur › भाजपविरोधात एकत्र येऊ; अशोक चव्‍हाणांची शेट्टींना गळ

भाजपविरोधात एकत्र येऊ; अशोक चव्‍हाणांची शेट्टींना गळ

Published On: Dec 03 2017 1:29AM | Last Updated: Dec 03 2017 1:30AM

बुकमार्क करा

जयसिंगपूर : प्रतिनिधी

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी शनिवारी खा. राजू शेट्टी यांची निवासस्थानी भेट घेतली. भाजपविरोधी रान उठविण्यासाठी काँग्रेस व मित्रपक्षाबरोबर खा. शेट्टींनी हात द्यावा, एकत्रित काम करू, अशी गळ चव्हाण यांनी घातली. शेट्टी यांनी ‘वेट अँड वॉच’ अशी भूमिका घेतल्याचे समजते.

आ. सतेज पाटील, माजी आ. प्रकाश आवाडे, गणपतराव पाटील यावेळी उपस्थित होते. शेट्टींनी भाजपविरोधी उठवलेले रान हा धागा पकडून काँग्रेस नागपुरात 12 किंवा 13 डिसेंबरला जो मोर्चा काढणार आहे, त्यामध्ये शेट्टींनी सहभागी व्हावे, असे आवाहन चव्हाण यांनी केले.

खा. शेट्टी यांनी, लोकसभा निवडणुकीत दिलेले आश्‍वासन भाजपने न पाळल्यानेच स्वाभिमानीसह सर्व शेतकरी संघटना भाजपविरोधी एकवटल्या आहेत. आम्ही संसदेवर मोर्चा काढला. गुजरात निवडणूक प्रचारातही शेतकरी संघटनेचे प्रमुख नेते उतरणार आहोत. काँग्रेस व मित्रपक्षाच्या भाजपविरोधी आंदोलनात सहभागी व्हायचे की नाही, हे शेतकरी संघटनेच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करून सांगतो, असे सांगितल्याचे समजते. चव्हाण यांनी, मुंबईत बैठक घेऊ, असेही सांगितले. यावेळी स्वाभिमानीचे भगवान काटे, सावकार मादनाईक, प्रा. जालंदर पाटील, सागर शंभूशेटे, शुभांगी शिंदे, युनूस पटेल उपस्थित होते.