Mon, Sep 24, 2018 10:59होमपेज › Kolhapur › जुना राजवाडाचे सहायक फौजदार अपघातात ठार

जुना राजवाडाचे सहायक फौजदार अपघातात ठार

Published On: Jan 02 2018 1:32AM | Last Updated: Jan 02 2018 1:17AM

बुकमार्क करा
कुरळप : वार्ताहर

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर तांदूळवाडी (ता. वाळवा) येथे रविवारी रात्री झालेल्या दुहेरी अपघातात  कारचालक अरविंद प्रभाकर छत्रे (वय 41, रा. कोल्हापूर) जागीच ठार झाले. छत्रे हे कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलिस ठाण्यात सहायक फौजदार होते.

या अपघातातील दुसर्‍या कारमधील तिघेजण जखमी झाले.  निहाल आयुब पठाण (24), रोहित राजकुमार माने (24, दोघेही रा. किणी, ता. हातकणंगले), अमोल जाधव अशी त्यांची नावे आहेत.अपघाताची नोंद कुरळप पोलिसांत झाली. अरविंद छत्रे यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.