Wed, Jun 26, 2019 11:24होमपेज › Kolhapur › कला उत्सवात कोल्हापूर ‘लयभारी’ 

कला उत्सवात कोल्हापूर ‘लयभारी’ 

Published On: Dec 02 2017 1:09AM | Last Updated: Dec 01 2017 11:47PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कला उत्सवात कोल्हापूर विभाग बाजी मारून ‘लयभारी’ ठरला आहे.

केंद्र सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयातर्फे 2015-16 पासून माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी कला उत्सवाचे आयोजन केले जाते.

जिल्हा व राज्यस्तरावर स्पर्धा घेऊन राज्याचा संघ निवडला जातो. त्यानुसार दि. 27 नोव्हेंबर रोजी पुणे येथे राज्यस्तरीय कला उत्सव स्पर्धा झाली. याचा राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाच्या प्रकल्प संचालक डॉ. सुवर्णा खरात यांनी नुकताच निकाल जाहीर केला आहे. 

यात द‍ृश्य कला, लोकसंगीत व लोकनृत्य प्रकारात कोल्हापूर विभागाने प्रथम क्रमांक मिळविला आहे. या कला प्रकारांमघ्ये कोल्हापूरमधील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. यामुळे राज्यस्तरावरील या स्पर्धेमध्ये कोल्हापूर विभागाचा ठसा उमटला आहे. 

दुसर्‍या स्थानावर मुंबई विभाग आहे. चारही कला प्रकारांमध्ये प्रथम क्रमांक मिळविलेले संघ 3 ते  6 जानेवारी 2018  या कालावधीत भोपाळ येथे होणार्‍या राष्ट्रीय कला उत्सवात सहभागी होणार आहेत.