Thu, Apr 25, 2019 15:30होमपेज › Kolhapur › अपघातानंतर वृद्धाला रस्त्यावर सोडून पलायन केलेल्यास अटक

अपघातानंतर वृद्धाला रस्त्यावर सोडून पलायन केलेल्यास अटक

Published On: Aug 14 2018 1:09AM | Last Updated: Aug 14 2018 12:47AMकोल्हापूर : प्रतिनिधी

दुचाकीने धडक दिल्यानंतर बेशुद्ध अवस्थेत वृद्धाला रंकाळा टॉवरजवळील जाऊळाचा गणपती मंदिरासमोरील रस्त्यावर सोडून पलायन केलेल्या तरुणाला जुना राजवाडा पोलिसांनी सोमवारी सायंकाळी अटक केली. अभिमन्यू जयसिंग पाटील (वय 22. रा.पहिली गल्ली, उजळाईवाडी, ता. करवीर) असे त्याचे नाव आहे.

दुचाकीच्या धडकेत शंकरराव रामचंद्र मोरे (वय 77, रा. धोत्रे गल्ली, गंगावेश, सद्या, रा. रणवरे कॉलनी, कळंबा) जखमी झाले होते. मात्र, वेळेत उपचार न झाल्याने त्यांचा दि. 16 जुलैला मृत्यू झाला होता. दि. 10 जुलैमध्ये शिवाजी पेठेतील लाड चौकात ही घटना घडली होती. मोरे हे या दिवशी कामावरून घरी जात असताना दुचाकीस्वाराने धडक दिली. त्यात डोक्याला गंभीर इजा झाली. रक्‍तस्त्राव झाल्याने  बेशुद्ध झाले. घटनास्थळी जमलेल्या नागरिकांना आपण जखमीला सीपीआरमध्ये घेऊन जात असल्याचे त्याने भासविले होते. रिक्षातून वृद्धाला जावळाचा गणपती मंदिराजवळ आणले आणि रस्त्यावरच सोडून पलायन केले. 

सारा घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. नातेवाईकांसह नागरिकांनी राजवाडा पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिस निरीक्षक मानसिंह खोचेसह पथकाच्या अथक प्रयत्नानंतर संशयिताचा छडा लागला.