Thu, Aug 22, 2019 12:30होमपेज › Kolhapur › कोल्हापूरच्या रखडलेल्या प्रश्‍नांचे ‘एप्रिल फूल’!

कोल्हापूरच्या रखडलेल्या प्रश्‍नांचे ‘एप्रिल फूल’!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

‘पुलात पूल शिवाजी पूल... समस्त कोल्हापूरकर एप्रिल फूल...’, ‘जागतिक फेकू दिनाच्या 15-15 लाख शुभेच्छा’, ‘दुसर्‍याला एप्रिल फूल करण्यापेक्षा एक झाड लावून एप्रिल कूल बनवू या...’ अशा राजकीय विडंबन व पर्यावरण रक्षणाचा संदेश देणार्‍या नेटकर्‍यांच्या पोस्टने रविवारी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. दुसरीकडे, नेटिझन्सनी कोल्हापूरच्या रखडलेल्या सामाजिक प्रश्‍नांकडे लक्ष वेधत राज्यकर्ते व प्रशासनास ‘टार्गेट’ करीत खिल्ली उडविली.

‘एप्रिल फूल’ हा दिवस स्टिव्ह एप्रिल नावाच्या व्यक्तीच्या मृत्यूपश्‍चात साजरा केला जाणारा दिवस. 1 एप्रिल फूल या दिवशी किमान 5 ते 10 जणांना काही तरी सांगून फूल (मूर्ख) करण्याचे उद्योग सर्रास केले जातात. सोशल मीडिया यात मागे नाही. एप्रिल महिना सुरू होण्यापूर्वी काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘एप्रिल फूल’चे मेसेज फिरत आहेत. यात राजकीय पक्षांवर टीका करणार्‍या मेसेजसह व पोलिस व प्रशासनास ‘कामाला’ लावणारे मेसेज जास्त व्हायरल झाले आहेत. ‘एप्रिल फूल बनाया, तुमको गुस्सा आया’ म्हणत सोशल मीडियावरील नेटिझन्सनी चेष्टा-मस्करी करीत एप्रिल महिन्याचा पहिला दिवस एन्जॉय केला. 1 एप्रिल ही तारीख लक्षात ठेवून केवळ मनोरंजन म्हणून याकडे बघा, अशा सूचना सोशल मीडियावरील पोस्टच्या शेवटी लिहिण्यात आल्या होत्या.

मकरंद अनासपुरे राजकारणात
अभिनेते मकरंद अनासपुरे यांची राजकारणात उडी... महाराष्ट्र दिनी ‘शेतकरी वाचवा’ पक्षाची स्थापना करणार.

सतेज पाटील-धनंजय महाडिक यांचे मनोमीलन
काँग्रेसचे आ. सतेज पाटील व राष्ट्रवादीचे खा. धनंजय महाडिक यांचे मनोमीलन झाले. भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मध्यस्थी केली. यानंतर दोघांनी एकत्रित काम करण्याचा निर्णय घेतल्याच्या वावड्या ‘एप्रिल फूल’च्या निमित्ताने सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. 

बारा महिने ‘एप्रिल फूल’ !
कोल्हापूरकरांना ‘एप्रिल फूल’ नवीन नाही. विमान सेवा लवकरच...पंचगंगेवर पावसाळ्यापूर्वी पूल... देणगी घेणार्‍या शाळांवर कारवाई...  असल्या घोषणा ऐकतच आहोत. हे म्हणजे बारा महिने ‘एप्रिल फूल’ बनविण्यासारखेच आहे, अशा पोस्ट व्हायरल झाल्या. त्या लाईक्स केल्या जात होत्या व शेअरही होत होत्या.

Tags : Kolhapur district, April Fool  


  •